आता मतदारांना मिळणार स्मार्ट इलेक्शन कार्ड

Now voters will get smart election card

 

 

 

जुन्या कृष्णधवल मतदार ओळखपत्राऐवजी स्मार्ट कार्ड स्वरुपात निवडणूक ओळखपत्र अर्थात ‘इपिक’ कार्ड देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला.

 

गेल्या दहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील ७ लाख ६० हजार ५५९ मतदारांना असे कार्ड वाटप करण्यात आले आहेत. मतदारांनी आठ क्रमाकांचा

 

अर्ज भरल्यानंतर त्यांना घरपोच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्मार्ट कार्ड स्वरुपातील ‘इपिक’ कार्ड दिले जाते. त्यामुळे मतदारांची ओळखही आता स्मार्ट बनली आहे.

 

‘इपिक’ कार्ड म्हणजे ‘इलेक्टेर्स फोटो आयडंटिफिकेशन कार्ड’ आहे. तर, या कार्डवर ‘इपिक’ नंबर म्हणजेच मतदार ओळख क्रमांक दिलेला असतो. ‘इपिक’ कार्डच्या वाटपाबाबत आम्ही पोस्ट विभागाला स्वतंत्र सूचना दिल्या आहेत.

 

त्याशिवाय संबंधित मतदारांपर्यंत निवडणुकीपूर्वीच इपिक कार्ड द्या. ज्या मतदारापर्यंत इपिक कार्ड पोहोचणार नाही त्यांना मोबाइलद्वारे

 

संपर्क करून त्यांच्यापर्यंत इपिक कार्ड पोहोचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *