परळी विधानसभा मतदारसंघात राडा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण
Rada Sharad Pawar group worker beaten up in Parli Assembly Constituency
परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर
उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. असा एक व्हिडिओ सध्या पुढे आल्याचे बघायला मिळत आहे.
मतदान केंद्राबाहेर उभे असताना ऍड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले.
घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र कोंड्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आला आहे
राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडतअसून, त्या अनुषंगाने परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील
सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण आणि शासकीय कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, अशी आगळी वेगळी मागणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
परळीतील प्रत्येक निवडणूक अत्यंत शांततेत पार पडते, मात्र मागील काही वर्षांचा अनुभव पाहता काही उमेदवार व कार्यकर्ते आम्हाला अडवणूक झाली, मारहाण झाली, हल्ला झाला,
अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करत असतात. त्यात काहीच तथ्य नसते, परंतु त्यातून परळी व पर्यायाने बीड जिल्ह्याची बदनामी होते,
त्यामुळे सर्वच प्रमुख उमेदवारांसाठी पोलीस संरक्षण व कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे, संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठीही व्यापक प्रयत्न व्हावेत. कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये,
तसेच असा काही प्रकार घडल्यास त्याचे चित्रीकरण केल्याने पोलिसांकडे दोषसिद्धी साठी ठोस पुरावा हातात असेल, त्यामुळे पोलीस संरक्षण व शासकीय कॅमेरामन सर्व प्रमुख उमेदवारांच्या सोबत असावा, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले.