मंत्रिमंडळात भाजपला २१ मंत्रिपदे शिंदे-दादांना किती?

BJP has 21 ministerial posts in the cabinet, how many for Shinde-Dada?

 

 

 

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष किंवा आघाडी दोनशेहून अधिक जागा मिळविण्याचा प्रकार राज्यात तब्बल ५२ वर्षांनंतर घडला आहे. यापूर्वी १९७२ च्या निवडणुकीत असे घडले होते.

 

यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दोनशेहून अधिक जागा मिळविण्याच्या इतिहासाची पाच दशकांनंतर पुनरावृत्ती केली आहे.

विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. २१-१२-१० अशी मंत्रिमंडळाची विभागणी केली जाऊ शकते.

 

यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सर्वाधिक म्हणजे २१ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

 

या सूत्रावर प्राथमिक चर्चा झाली असून तिन्ही पक्षांचे मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो.

 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर यश मिळालं. यात भाजपला १३२, शिवसेनेला ५७, तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच,

 

तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश आलं आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला ४६ जागा आल्या आहेत. काँग्रेसला १६, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना १० जागा, तर शिवसेना (ठाकरे गट) २० जागा मिळाल्या आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *