भाजपाने मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी,अर्धे भाजपावाले देश सोडून पळून जातील

BJP should show it on the ballot paper by holding elections, half of BJP members will flee the country

 

 

 

महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.

 

मात्र त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. एकनाथ शिंदे यांना गृह आणि अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपद नको, अशीही भूमिका घेतलेली आहे.

 

त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी येत असल्याची टीका आता विरोधक करत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यापुढे जाऊन टीका केली.

 

ते म्हणाले, मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर काही नेत्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तयार ठेवली पाहीजे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, काही लोकांना मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहीजेत.

 

एकनाथ शिंदे यांना आता कुणीही विचारत नाही. त्यांची नाराजी किंवा आनंद हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार हे कळसूत्री बाहुलीप्रमाणे असून ते गुलाम झाले आहेत.

 

गुलामांनी बंडाची भाषा करायची नसते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. गुलामांना आपल्या हक्कांसाठी बलिदान द्यावे लागते. मात्र ही हिंमत यांच्यात नाही.

 

महाविकास आघाडीचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला होता. यावरही संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे.

 

पोलीस, ईडीस, सीबीआय, आयटी अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते अशाप्रकारचे दावे करू शकतात. अशाप्रकारच्या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत खाली केला असता.

 

“भाजपाने मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी, निकालाची सुरुवात होताच अर्धे भाजपावाले देश सोडून पळून जातील. माझ्यासारखा माणूस कुणाला घाबरत नाही.

 

आम्ही तुरूंगवास सहन केला आहे. रक्त सांडले, रक्त पाहिले असून आता आम्ही सभ्य झालो आहोत. सभ्य आहोत तोपर्यंत ठीक आहे,

पण जर कुणी महाराष्ट्राच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहे आणि पहिला हुतात्मा संजय राऊत असेल”, असेही संजय राऊत पुढे म्हणाले.

 

राज्यात महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा महायुतीकडून केला जात आहे.

 

त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी अजित पवार यांच्यापुढे काय प्रलोभन ठेवले त्यासंदर्भातील गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

 

शरद पवार यांच्या गटातील खासदार अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, माझी माहितीनुसार अजित पवार यांना एक ऑफर दिली आहे.

 

त्यांना सांगितले गेले आहे की तुम्ही पवार साहेबांचे (शरद पवार) यांचे पाच खासदार फोडून घेऊ या. मग तुमचे सहा खासदार होतील.

 

त्यानंतर तुम्हाला तुम्हाला मंत्रिपद देऊ. कारण केंद्रात सहकारी पक्षाला मंत्रिपदासाठी सहा खासदार हवे आहे, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपकडून सांगितले आहे, अशी मला माहिती मिळाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

 

राऊत पुढे म्हणाले, वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार यांनी प्रचंड मेहनत करुन दहा खासदार निवडून आणले आहे. आता ते खासदार फोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे फुटणाऱ्यास लाज वाटली पाहिजे.

 

मी पक्ष सोडून जाण्याचे पाप मी केले असते, तर माझ्यात बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या नजरेस नजर भिडवण्याची हिंमत झाली नसती. मला वाटले असते मी पाप केले आहे, माझे मन मला खाल्ले असते. परंतु या लोकांनी लाज सोडली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *