बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अदानीच नाव ?

Adani's name in Baba Siddiqui murder case

 

 

 

मी आरोपपत्र वाचलेलं नाही. पण पोलिसांना तपासत जे आढळलं, ते पोलिसांनी लिहिलेलं असेल. त्यातूनही झिशान सिद्दीकीच समाधान झालेलं नसेल, त्याचा काही वेगळा अँगल असेल, सरकार त्यांचच आहे.

 

त्याने सरकारकडे पुन्हा तक्रार करावी. पोलीस पुन्हा चौकशी करतील. यात सत्य अजून काही लपलेलं असेल, ते त्याला माहित असेल, कोणा-कोणाचे त्याच्या वडिलांना फोन येत होते.

 

अशा बातम्या सतत टीव्हीवर येते होत्या. छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली ही बातमी मी टीव्हीवर पाहिलेली. असं काय असेल ते अँगल तपासून बघितले पाहिजेत” उद्धव ठाकरे गटाचे नेते असं अनिल परब म्हणाले. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकीने अनिल परब यांचं नाव घेतलं आहे.

“सरकार, पोलीस त्यांचेच आहेत. त्यांची अजूनही काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं. त्यांच्याच पोलिसांवर त्यांचा अविश्वास असेल, तर यात मी काही करु शकत नाही.

 

यात त्याचं समाधान होत नसेल, तर त्याने पुन्हा एकदा दाद मागवी” असं अनिल परब म्हणाले. पत्रकारांनी त्यांना विचारलं की, त्याचा असा समज असा आहे की पृथ्वी चव्हाण बिल्डरला तुम्ही आणलं. त्या बिल्डरने फसवलं असं त्याचं म्हणणं आहे.

 

“जीबीआर झाली आहे. त्या जीबीआरमध्ये रेकॉर्डिंग आहे. ते रेकॉर्डिंग एसआरएला जातं. एसआरएचे अधिकारी त्याची दखल घेतात. या सगळ्याचा कुठेना कुठे उल्लेख असेलच ना. बिल्डरला आम्ही सगळेच ओळखतो.

 

बिल्डर आम्ही आणत नाही, लोक आणतात. त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं. त्या सभेला आम्ही उपस्थित होतो. त्यात गैर काय?” असा सवाल अनिल परब यांनी केला.

 

ज्ञानेश्वर नगरच्या विकासासाठी खासगी बिल्डरला आणण्याचा तुमचा प्रयत्न होता. मोहित कंबोज यांचं बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या अर्धातास आधी व्हॉटस अॅपवर बोलणं झालं होतं.

 

11 बिल्डरची नाव दिली आहेत, या प्रश्नावर अनिल परब म्हणाले की, “याची चौकशी करावी. हे 11 बिल्डर कोण आहेत? त्यांची नाव काय आहेत? त्या सगळ्याची चौकशी पोलिसांनी करावी.

 

माझ्या माहितीप्रमाणे अदानीच पण नाव आहे. त्याला देखील बोलवावं. बाबूलाल वर्मा, शिवालीक वेंचर, पृथ्वी चव्हाणच नाव आहे.

 

माझ मत असं आहे की, या सगळ्यांना बोलावून तपासून घ्या. पोलिसांनी पूर्ण तपास करावा. यात कुठलीही आडकाठी येऊ नये, सत्य समोर येऊद्या” असं अनिल परब म्हणाले.

 

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने यात अनिल परब यांचं नाव घेतलय.

 

अनिल परब यांनी आज यावर स्पष्टीकरण दिलं. झिशान सिद्दीकीने त्याच्या जबाबात या प्रकरणाला SRA शी जोडण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या वडिलांच्या हत्येमागे एसआरएचा अँगल असल्याची त्याची भावना आहे.

 

“आम्ही ज्या एसआरए बैठकीला गेलेलो, तिथे कृणाल सरमळकर होते. मनसेचे पदाधिकारी होते. ही सर्वपक्षीय सभा होती. पोलिसांनी कधीही चौकशी करावी बाकीचे अँगल तपासून बघा. आरोप करुन चालणार नाही,

 

आरोप सिद्ध करावे लागतील. बाबा सिद्दीकींचे कोणाशी संबंध होते? कशा संदर्भात बोलण झालं? ते तपासलं पाहिजे” असं अनिल परब म्हणाले.

 

झिशान सिद्दीकीचे जे स्टेटमेंट दिलय, त्यामागे कुठलं राजकारण आहे का? यावर अनिल परब म्हणाले की, “हे सगळं राजकारण आहे का? किंवा काय हे त्यालाच माहिती.

 

वस्तुस्थिती बाहेर येऊ नये, म्हणून कदाचित SRA चा अँगल लावला जात असेल. मी टीव्हीवर बातमी पाहिलेली, छोटा शकिलने धमकी दिलेली.

 

छोटा शकीलने बाबा सिद्दीकींना धमकी का दिलेली हे तेच लोक सांगू शकतात. कारण त्यांचे व्यवहार काय होते, ते आम्हाला माहित नाही. मग अशा गोष्टी लपवण्यासाठी हा अँगल बदलला जातोय का? याचा देखील तपास पोलिसांनी करावा”

 

खरी वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय, तुमची माहिती काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “मला माहिती नाही, यांचे काय व्यवहार आहेत? बाबा सिद्दीकींना मी ओळखायचो.

 

झिशानला सुद्धा ओळखतो. यांचे व्यवहार माहित नाहीत. एखाद्याचा खून होतो, चार-पाच गोष्टी असतात. व्यक्तीगत दुश्मनी, मालमत्तेची भानगड, पैशाची भानगड किंवा बाईवरुन भानगड त्या व्यतिरिक्त खून होण्याचं दुसरं कारण काय?.

 

या हत्येच कारण पोलिसांनी बाहेर आणलं पाहिजे” असं अनिल परब म्हणाले. पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे. झिशानच समाधान होत नसेल, तर त्याने पुन्हा चौकशीची मागणी करावी असं अनिल परब म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *