उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील यांची दांडी ,चर्चाना उधाण

Parbhani MLA Rahul Patil's dandi at the meeting called by Uddhav Thackeray sparks controversy

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंचे काही माजी आमदार, पदाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटात चलबिचल झाली आहे. पक्षाची बांधणी करण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने आज मातोश्रीवर आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, दोन आमदारांनी दांडी मारली आहे.

ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असलेले आउटगोईंग थांबवणे, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत.

 

आजच्या आमदारांच्या बैठकीत विधानसभा विरोधी पक्ष नेत्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

या आमदारांच्या बैठकीत येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे? सरकारसमोर राज्यातील सामान्यांचे, शिवाय गाजत असलेले विषय मांडून घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरवली जाणार आहेत.

 

विरोधी बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे.

 

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव,आदित्य ठाकरे,आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

 

विधानसभा विरोधी पक्षनेता बाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे.

 

हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधीपक्षनेते पदासाठी कोणाच नावं अंतिम करायचा? यावर आमदारांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

मातोश्रीवरील बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी हजेरी लावली आहे. त्याशिवाय, काही महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत.

 

विधानसभेतील आमदार दिलीप सोपल, राहुल पाटील अनुपस्थित राहिले आहे. हे दोन्ही आमदार वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित राहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *