राज्यसभेत वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयकावर मतदानाला शरद पवारांची दांडी
Sharad Pawar's stance on voting on Waqf Board Act Amendment Bill in Rajya Sabha

मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास जवळपास 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरून विरोध आणि समर्थन करणारी भाषणे झाली.
राज्यसभेत काठावरचे बहुमत असलेल्या सरकारने सहजपणे बहुमत जमवले. राज्यसभेतील मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अनुपस्थित होते.
पवारांच्या गैरहजेरीवरून चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.
वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले. जवळपास 12 तासाच्या चर्चेनंतर राज्यसभेत मतदान झाले. वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली, तर 95 सदस्यांनी विरोधात मतदान केले.
राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 मंजूर करुन घेणं, ही मोदी सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान होते. राज्यसभेत झालेल्या मतदानात विरोधी बाकांवरील राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे अनुपस्थित राहिले.
लोकसभेत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वक्फ सुधारणा विधेयकावर आक्रमक झाले होते. राज्यसभेत महाविकास आघाडीचे नेते शरद पवार वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाही. त्यावरून राजकीय चर्चा रंगली होती.