Maharashtra Corona Alert;पुढील २८ दिवसांत कोरोनाची चौथी लाट येणार? पुन्हा लॉकडाऊन, काय घडणार?
Maharashtra Corona Alert;Will the fourth wave of Corona come in the next 28 days? Lockdown again, what will happen?


गेल्या काही आठवड्यांपासून भारतासह २० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. JN.1 आणि BA.2.86 यासारखे काही नवीन वेरिएंट्स वेगाने पसरत आहेत.
हे सुद्धा वाचा !….. Rain warningALERT;1 ते 3 जून दरम्यान कुठे पडणार पाऊस ;हवामान विभागाचा काय आहे अंदाज ?
त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे यावेळी कोविड गेल्या दोन तीन वर्षांपेक्षा जास्त धोकादायक बनला आहे का? विषाणूमध्ये काही धोकादायक उत्परिवर्तन झालं आहे का?
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील मेडिसिन विभागातील डॉ. अजीत कुमार सांगतात की सध्या हवामानात मोठा बदल झालेला आहे. एकीकडे पावसाळी वातावरण, दुसरीकडे उष्णता आणि आर्द्रतेचा वाढलेला स्तर.
हे सुद्धा वाचा !…..आता गुरुजींसाठी टेन्शनची बातमी ; ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार ‘परीक्षा
यामुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या सामान्य व्हायरल आजारांना खतपाणी मिळतं. अशा वातावरणात एक व्हायरस दुसऱ्यावर मात करतो आणि त्यातून कोरोना सारखा संसर्गही झपाट्याने पसरतो.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर शरीरात निर्माण झालेली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) काही महिन्यांनी कमी होऊ शकते.
हे सुद्धा वाचा !…..World War III;डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान;रशियाने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी
वेळोवेळी होणाऱ्या म्यूटेशनमुळे नवीन वेरिएंट्स समोर येतात आणि पूर्वीची इम्युनिटी त्या वेरिएंट्सविरुद्ध पुरेशी ठरत नाही. त्यामुळेही नवीन रुग्णसंख्या वाढतेय.
JN.1 आणि BA.2.86 दोन्ही वेरिएंट्स आधीच्या तुलनेत अधिक वेगाने पसरण्याची क्षमता बाळगतात. मात्र जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्याकडून अजूनपर्यंत ही वेरिएंट्स अधिक घातक असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सध्या उपलब्ध माहितीनुसार हे वेरिएंट्स सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सौम्य ताप, अंगदुखी यासारखी सामान्य फ्लूसारखेच लक्षणं निर्माण करतात. जसे की .
हे सुद्धा वाचा !…..Pankaja Munde News; धनंजय मुंडेच्या विपश्यना केंद्रात;काय म्हणाल्या पंकजा मुंडे
महामारी तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर यांचं म्हणणं आहे की, २०२० मध्ये जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती आज नाही. आजचे वेरिएंट्स तुलनेने सौम्य आहेत आणि रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, मात्र सावध राहणं आवश्यक आहे.
सध्याचा कोरोना संसर्ग हा २०२०-२१ सारखा गंभीर नसला, तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. सतत बदलत जाणाऱ्या वेरिएंट्समुळे परिस्थिती वेगाने बदलू शकते.
हे सुद्धा वाचा !…..थेट गृहराज्यमंत्र्यांनीच मध्यरात्री टाकली बारवर धाड;पोलीस खात्याचे पितळ उघडे पडले
त्यामुळे खबरदारी घेणं आणि वेळेवर तपासणी व उपचार करणं हे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आरोग्य संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करून आपण स्वतःचा आणि समाजाचा बचाव करू शकतो.
भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1255 वर तर आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
हे सुद्धा वाचा !…..थेट गृहराज्यमंत्र्यांनीच मध्यरात्री टाकली बारवर धाड;पोलीस खात्याचे पितळ उघडे पडले
त्याचबरोबर केरळ, महाराष्ट्र, दिल्लीसह, उत्तर प्रदेशातही कोरोनाच्या नवीन प्रकारांचे रुग्ण सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत आता कोरोनाची चौथी लाट येते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यान आता कोविडच्या वाढत्या धोक्यात BHU च्या एका शास्त्रज्ञानेही एक मोठा दावा केला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे म्हणाले की, कोरोनाचा हा नवीन उप प्रकार JN.1 आहे जो आता आशियाई देश सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका नंतर भारतात पसरत आहे.
हे सुद्धा वाचा !…..narayan rane;राणेंनी केली उद्धव ठाकरे,राज ठाकरेंवर टीका,संजय राऊत म्हणाले; वय झालं, टोपाचे केसही पिकलेत, त्याचं भान ठेवा
कोविडच्या वेगवेगळ्या लाटांचा संसर्ग कालावधी वेगवेगळा राहिला आहे. पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, त्यामुळे संसर्गाचा वेग खूपच कमी होता. या कारणास्तव, पहिल्या लाटेत संसर्ग कालावधी सुमारे ६० दिवसांचा होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत, हा कालावधी २१ दिवसांत उच्च पातळीवर पोहोचला.
त्याच वेळी, तिसरी लाट येथे २८ ते ३२ दिवस सक्रिय राहिली. यावरून हे स्पष्ट होते की, ओमिक्रॉनचा हा उप प्रकार लोकांना आणखी वेगाने प्रभावित करू शकतो. ज्याच्या आधारे असे म्हणता येईल की तो २१ ते २८ दिवसांत उच्च पातळीवर पोहोचू शकतो. त्यानंतर, कोविडचे रुग्ण पुन्हा कमी होऊ लागतील.
हे सुद्धा वाचा !…..Maharashtra Cabinet Decision; मंत्रिमंडळ निर्णय; 27 मे , 2025
तसेच कोरोना JN.1 आणि NB.1.8 चे हे दोन नवीन प्रकार किती प्राणघातक असू शकतात. यासाठी त्यांची टीम सतत संशोधन करत आहे. नवीन प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग खूप महत्वाचे आहे.
अशा प्रकारे विषाणूचे उत्परिवर्तन शोधले जाते. दुसऱ्या लाटेदरम्यान, अल्फासोबत कोरोनाचे आणखी दोन प्रकार आढळले. त्यामुळे समुदायाचा प्रसार झाला आणि त्यानंतर सर्वाधिक मृत्यू झाले. यावेळी अशी शक्यता आहे की नाही यावर संशोधन सुरू आहे.
लवकरच बीएचयूमधील शास्त्रज्ञांची एक टीम वाराणसीतील सीवरचे नमुने गोळा करून त्यांची चाचणी करणार आहेत. या चाचणीतून विषाणूच्या आत किती प्रती आहेत हे स्पष्ट होईल. यामुळे समुदायाचा प्रसार आणि येणारा धोका शोधण्यास मदत होईल.
हे सुद्धा वाचा !…..मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ,अजितदादा, एकनाथ शिंदे पेक्षा शरद पवार भारी ; तोंडभरून कौतुक
जरी सामान्य लोकांसाठी फारसा धोका नसला तरी काही गटातील लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल:
ज्येष्ठ नागरिक
डायबिटीज, अस्थमा, हृदयरोग किंवा कॅन्सरग्रस्त रुग्ण
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे (इम्युनो-कॉम्प्रोमाईज्ड)
या व्यक्तींमध्ये संसर्ग गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते.
पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक पदार्थाचे सेवन, सर्दी खोकला होईल गायब
हे सुद्धा वाचा !…..कुर्बानीसाठी अतिशय स्वस्त दरात शेतकऱ्याकडून बकरे विक्रीला
काळजी कशी घ्यावी?
१. मास्कचा वापर
भीडभाड असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं अजूनही एक प्रभावी उपाय आहे. खास करून प्रवास करताना, हॉस्पिटलमध्ये किंवा गर्दीच्या बाजारात जाताना मास्कचा वापर अवश्य करा.
२. स्वच्छतेची काळजी
हात वारंवार साबणाने धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. खोकताना किंवा शिंकताना रूमाल किंवा कोपराचा वापर करा.
हे सुद्धा वाचा !…..ज्योती मल्होत्रानंतर पुन्हा तिघां गुप्तहेराना महाराष्ट्रात अटक
३. सामाजिक अंतर राखा
सामाजिक अंतर राखण्याची सवय अजूनही उपयोगी ठरते. विशेषतः लक्षणं असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळा.
४. लसीकरणाची तपासणी करा
आपल्या शेवटच्या कोविड लसीकरणानंतर एक वर्षाहून अधिक काळ गेला असेल तर बूस्टर डोसबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. लक्षणं दिसल्यास तपासणी करा
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे यांसारखी लक्षणं आढळल्यास कोविड चाचणी करून घेणं उत्तम. लक्षणं सौम्य असली तरी घरात इतर लोकांचा संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरण पाळा.