थेट गृहराज्यमंत्र्यांनीच मध्यरात्री टाकली बारवर धाड;पोलीस खात्याचे पितळ उघडे पडले

The Minister of State for Home Affairs himself raided the bar at midnight; the police department's brass was exposed

 

 

महारष्ट्रातील गृहराज्यमंत्री कदम यांनी धाडसी कामगिरी करत थेट डान्सबार वॉर धड थकल्याने पोलीस विभागाचे पितळ उघडे पडले आहे, महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आहे.

 

असे असताना देखील महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छुप्यापद्धतीने डान्स बार सुरु आहेत. डान्स बार विरोधात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डान्स बारवर थेट गृहराज्यमंत्र्यांनी धाड टाकली आहे.

हे सुद्धा वाचा ;…….सुप्रिया सुळेंची राजकीय चाल बदलली ,मोदी सरकारला पाठिंबा तर इंडिया आघाडीला सुनावले

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी इथल्या अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली. ‘द रेस’ अस या डान्सबारचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बार वर धाड टाकली.

 

या बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये बारगर्ल अश्लिल नृत्य करत असल्याचे दिसून आले. यावेळी 40 बारगर्ल आणि 6 वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रात अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु असतील तर ते तातडीने बंद करावेत. अन्यथा कडक करावाई केली जाईल अशा इशारा देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा ;…….Marathwada News;मराठवाड्यातील मंत्र्याला राऊत म्हणाले ,पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला क्या !

2005 मध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले. आर. आर. पाटील यांनी असाच प्रकारे डान्सबार छापेमारी केली होती. डान्सबारमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे.

 

यामुळे कायद्याने डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा ;…….Maharashtra Cabinet Decision; मंत्रिमंडळ निर्णय; 27 मे , 2025

नालासोपाराच्या प्रगती नगरातून 240 ग्राम वजनाचा एम, डि, मेफेड्रोन नावाचा ड्रग नायझेरिअन नागरिकांकडून जप्त करण्यात आला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.

 

बेन जोसेफ औनुमेरे एज़ीवगो (46) जॉन ओकाफोर (31) फेवर फ़िबी यूसुफ (36) असे या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल 48 लाख 24 हजाराचा , तुळींज पोलिसांनी पकडला आहे.

हे सुद्धा वाचा ;…….political news;महायुतीत तणाव;अजितदादांच्या माजी मंत्र्याला बावनकुळेंनी सुनावले

पोलिसांच्या कारवाईत त्यांच्याकडे भारत देशात वास्तव्य करण्याकरिता आवश्यक असलेलं पारपत्र व व्हिसा आढळून आले नाही.

 

ते नालासोपाराच्या , घर क्रमांक 203 या इमारतीमध्ये राहत होते. त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या घर मालकावर तसेच घर दाखवणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना, 2005 मध्ये डान्सबार बंदी घातली होती. मात्र डान्सबार कायदा सुधारणेबाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली असून

हे सुद्धा वाचा ;……. political news;भुजबळ मंत्री झाले पण अजित पवारांना विचारलेच नाही ,नेत्याच्या दाव्याने खळबळ

सरकार पुन्हा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे असे ते म्हणाले होते . मात्र सरकारच्या या चर्चेवरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता

 

जर सरकार डान्सबार सुरू करण्याचा घाट घालत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरु असा इशारा त्यांनी सांगलीत माध्यमांशी बोलतांना दिला होता .

,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *