Crime News;पत्नी सरपंच आणि पती निघाला सायबर दरोडेखोर ,पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Crime News;Wife Sarpanch and husband turned out to be cyber robbers, police kept quiet

 

 

 

देशभरात सायबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नवीन क्लुप्त्या वापरून हे सायबर भामटे सर्वसामान्यांना गंडा घालत असतात. सर्वसाधारणपणे हे भामटे परराज्यातले किंवा परदेशातील असतात.

 

मात्र पुण्यातील एका अशाच सायबर चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाशी निगडित असणारा भामटा पुणे पोलिसांनी जेरबंद केला आहे.

हे सुद्धा वाचा;Rain warningALERT;1 ते 3 जून दरम्यान कुठे पडणार पाऊस ;हवामान विभागाचा काय आहे अंदाज ?

तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (२८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे या सायबर भामट्याचे नाव आहे. मनी लाँड्रिग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची याने

 

सहा कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या वाजंत्रीने फक्त एकाच नाही तर डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याचं तपासात निष्पत्र झालं आहे.

हे सुद्धा वाचा;Pankaja Munde News; धनंजय मुंडेच्या विपश्यना केंद्रात;काय म्हणाल्या पंकजा मुंडे

आरोपी बांधकाम व्यावसायिक आहे. इतकंच नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निकटवर्तीय असून त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकता असून ती गावची सरपंच देखील आहे.

वाजंत्रीने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली. मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठवण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा;महायुतीचे मंत्री म्हणाले, मंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी

त्यानंतर १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान फसवणूक झालेल्या जेष्ठ व्यक्तीने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी २९ लाख रुपये जमा केले.

 

मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांना ती रक्कम वाजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले

हे सुद्धा वाचा;काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी आमदार भाच्याला फटकारले

सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी त्याने त्यातील 90 लाख आणि 20 लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. ज्या खात्यात हे पैसे ठेवण्यात आले होते ते बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे तपासात उघड झाले.

 

त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहचले. पण राजकीय संबंध असलेल्या वाजंत्री याला पोलिसांची चाहूल लगेच लागली. पोलीस येत आहेत हे कळताच तो तिथून फरार झाला.

हे सुद्धा वाचा;अजित पवारांकडून स्वतःच्याच मंत्र्याला कानपिचक्या

पुढे पोलिसांना तुषार वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती एका खबऱ्याने दिली. त्यातूनच पुणे पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

तर सायबर चोरीच्या गुन्ह्यामध्ये केरळ पोलीस सुद्धा या वाजंत्रीच्या मागावर होते. पुणे पोलिसांनी केरळ पोलिसांची संपर्क साधला आहे. या वाजंत्रीच्या विरोधात नॅशनल सायबर पोर्टलवर वेगवेगळ्या राज्यातून पाच तक्रारी दाखल आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *