निवडणूक आयुक्तांनी सांगितले ,विधानसभा निवडणुकीची तारीख?

The election commissioner said, the date of assembly election?

 

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकीबाबत सविस्तर माहिती सांगितली.

 

विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारी असणार, याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘आमचा महाराष्ट्र आमचं मतदान’ हा आमचा नारा आहे.

 

लोकशाहीच्या उत्सवात लोक आपलं योगदान देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ‘आपले मत, आपला हक्क’ ही आपली जबाबदारी आहे, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

 

आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसंच इतरांचीही भेट घेतली.

 

आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही काँग्रेस, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, आप,

 

बसपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा,

 

अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा, अशीही विनंती आम्हाला करण्यात आली.

 

लोकांना मतं देताना कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. जे मतदार फोन घेऊन येतात त्यांना तो सोडून जाताना आणि परत नेताना अडचणी येतात.

 

त्याची व्यवस्था करावी, अशीही विनंती करण्यात आली. पैशांचा गैरवापर, मसल पॉवर रोखण्याचीही विनंती केली. वृद्ध लोकांच्या येण्याची-जाण्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली.

 

पोलिंग एजंट हा स्थानिक असावा अशीही विनंती करण्यात आली. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं. फेक न्यूजचा प्रचार आणि प्रसार थांबवावा अशीही विनंती आम्हाला सर्व पक्षांनी केली.

 

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल.

 

महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत.

 

वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल.

 

 

पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असेही राजीव कुमार म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *