खलिस्तानवादीयांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची कार अडवण्याचा केला प्रयत्न;VIDEO

Khalistanis tried to block Foreign Minister Jaishankar's car;VIDEO

 

 

 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे चॅथम हाऊस थिंक टँकच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या कारच्या दिशेने निघाले,

 

त्यावेळी आधीपासूनच तिथे विरोध करणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी त्यांना पाहून घोषणाबाजी सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहादिवसीय ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये ते चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

तिथे ते भारताचा उदय आणि विश्व भूमिका या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या दरम्यान ते काश्मीरपासून रेसिप्रोकल टॅरिफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल बोलले.

 

हा कार्यक्रम संपवून ते इमारतीच्या बाहेर आले. त्यावेळी आधीपासूनच तिथे खलिस्तान समर्थकांची घोषणाबाजी सुरु होती. त्यांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते.

 

जयशंकर जसे आपल्या कारच्या दिशेने पुढे गेले, एका खिलस्तानी समर्थकाने पळत जाऊन त्यांच्या कारचा मार्ग अडवला. त्या खलिस्तान्याने भारताचा तिरंगा झेंडा फाडला.

 

त्यावेळी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्या खलिस्तान समर्थकाला हटवलं. द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहादिवसीय ब्रिटन

 

आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम ते लंडनला गेले. तिथे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर आणि परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी यांची भेट घेतली.

 

“पाकिस्तानने भारताचा भाग POK चोरला आहे. आता तो परत मिळवण्याची प्रतिक्षा आहे. तो हिस्सा भारताकडे परत येताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता स्थापित होईल” असं मोठं विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमात केलं.

 

या कार्यक्रमात एका व्यक्तीने त्यांना काश्मीरच्या समाधानाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये शांतता बहाल करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात अमलात आणली.

 

सर्वात आधी आर्टिकल 370 हटवलं हे पहिलं पाऊल होतं. दुसरं पाऊल हे आर्थिक विकासासह सामाजिक न्याय बहाल करण्याचं होतं आणि तिसरं पाऊल हे चांगल्या मतदानाच्या टक्केवारीसह मतदानाच होतं

 

https://twitter.com/i/status/1897445973418500455

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *