Nanded News;अशोक चव्हाणांमुळे नांदेड भाजप झाली काँगेसयुक्त ,मोठ्या पदावर चव्हाणांच्या निष्ठावंतांची नियुक्ती

Nanded News; Nanded BJP became Congress-affiliated due to Ashok Chavan, Chavan loyalists appointed to big posts

 

 

 

भारतीय जनता पक्षाने आज महानगराध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये नांदेड महानगराध्यक्षपदावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी आमदार अमर राजूरकर यांची वर्णी लागली आहे.

 

विशेष म्हणजे पक्षातील आयात ऐवजी निष्ठावंताना संधी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अमर राजुरकर यांची महानगराध्यक्षपदी निवड केली आहे.

 

या निवडीने निष्ठावंतामध्ये प्रकर्षाने नाराजी दिसून येत आहे. राजूरकर यांच्या निवडीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील प्रयत्नशील होते.

 

अमर राजुरकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता,

 

त्यावेळी अमर राजुरकर हे आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात गेले. काही दिवसापूर्वी भाजपने राजुरकर यांना जिल्हा कार्याध्यक्षाची जवाबदारी सोपवली होती.

 

दरम्यान महानगरध्यक्ष पदावर वर्णी कोणाची लागणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजुरकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य #Bapusaheb Deshmukhबापूसाहेब देशमुख यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांची नावाची चर्चा होती.

 

आयात नेत्यांऐवजी पक्षातील निष्ठावंताना संधी देणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष #Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे भाजपातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

 

दुसरीकडे अमर राजुरकर यांना संधी मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रयत्नशील होते. अखेर भाजपने काँग्रेसमधून भाजपात आलेले राजूरकर यांची महानगराध्यक्ष पदी निवड केली. या निवडीने भाजपातील निष्ठावंत नाराज असल्याचे चित्र आहे.

 

नांदेड महानगराध्यक्षपदी भाजपने माजी आमदार #Amar Rajurkarअमर राजूरकर यांची निवड केली आहे. या निवडीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण अधिकची चर्चा राजूरकर यांनी निवडीपूर्वीच सुरु केलेल्या संपर्क कार्यालयाची होत आहे.

 

दोन महिन्यांपूर्वी अमर राजूरकर यांनी शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीमध्ये महानगराध्यक्ष नावाने कार्यालय सुरु केले आहे. त्यांना खात्री होती का या पदावर त्यांची वर्णी लागणार? का औपचारिकता? अशी ही चर्चा रंगत आहे.

 

 

आगामी काही दिवसात Local government electionsस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहे. सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. शिवाय जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचा प्रवेश प्रचार जोमाने सुरु आहे.

 

शिवसेना शिंदे गटाच्या बैठका सुरु आहेत. अशातच भाजपची सत्ता आणण्यासाठी नवनिर्वाचित महानगरध्यक्ष अमर राजुरकर यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे.

 

शिवाय पक्षातील अंतर्गत गटबाजी तसेच तिकीट वाटपादरम्यान होणारी नाराजी दूर करण्याचे आव्हान देखील राजूरकर यांच्यासमोर असणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *