बापरे…!! गावातील किराणा दुकानातुन साडेचार कोटींचे ड्रग्स जप्त

Bapre... Drugs worth four and a half crore seized from village grocery shop

 

 

 

 

 

कल्याण क्राईम ब्रँचने अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावातील किराणा दुकानात छापा टाकत सुमारे साडे चार कोटी रुपये किमतीचे तीन किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत.

 

 

 

या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कुमार प्रेमचंद तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

 

तर शैलेंद्र अहिरवार हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. हे दोघे ड्रग्स कुणाला विकत होते? कुठून आणत होते? यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत?

 

 

 

 

याचा शोध आता कल्याण क्राईम ब्रँच घेत आहे . दरम्यान केला काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे अनेकदा आढळून आल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे .

 

 

 

 

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाला माहिती मिळाली .

 

 

 

माहिती मिळताच कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने या किराणा दुकानात छापा टाकला. या कारवाईत दरम्यान दुकानात तीन किलो अमली पदार्थ आढळून आले.

 

 

 

 

या ड्रग्सची किंमत सुमारे 4 कोटी 52 लाख 29 हजार रुपये आहे.या प्रकरणी कल्याण क्राईम पोलिसांनी राजेश कुमार तिवारी याला बेड्या ठोकल्या आहेत तर त्याचा साथीदार शैलेंद्र अहिरवार हा फरार झाला असून पोलिस याचा शोध घेत आहेत.

 

 

 

राजेश कुमार तिवारी याचे नेवाळी परिसरात गायत्री किराणा मालाचे दुकान आहे . या दुकानातून तो अमली पदार्थांची विक्री करत होता .

 

 

हे ड्रग्स कुणाला विक्री केले जात होते व कुठून आणले जात होते ,या दोघांव्यतिरिक्त आणखी कोण त्यांच्या टोळीत आहे का ? याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच पोलीस करत आहेत.

 

 

दरम्यान एका किराणा मालाच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *