देशातील SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का;एक निर्णयाचा कोट्यवधी लोकांना फटका
Big blow to SBI customers in the country; One decision affects crores of people


स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहे. या सर्व ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
हे सुद्धा वाचा;Corona Breaking News;कोरोनाची साथ ;रूग्णालयांना अलर्ट राहण्याचे आदेश
स्टेट बँकेने त्यांच्या अल्प आणि दीर्घ अशा सर्व मुदतीच्या एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांना कमी व्याज मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व एफडी योजनांवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने आणि बचत खात्यांवरील व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे आता यापुढे ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे. हे नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत.
हे सुद्धा वाचा;इस्रायल-इराण युद्ध चिघळले तर हे गंभीर परिणाम शकतात
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांनी व्याजदर कमी केले होते. त्यांतर आता एसबीआयनेही व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे सुद्धा वाचा;इराणने पांढरा झेंडा फडकवला, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा नेतान्याहूंपुढे सिझफायरचा प्रस्ताव
एसबीआयने सर्व नियमित एफडी कालावधींवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने कमी केला आहे. या कपातीनंतर आता बँक सामान्य नागरिकांना एफडीवर कमीत कमी 3.05 % आणि जास्तीत जास्त 6.45% पर्यंत व्याज देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक कमीत कमी 3.55 % आणि जास्तीत जास्त 7.05 % व्याज देत आहे. हे नवीन दर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा;विमानाच्या चाकातून आग आणि धूर 250, हज यात्रेकरू बालंबाल बचावले
स्टेट बँकेने बचत खात्याचा व्याजदर वार्षिक 2.5 % केला आहे. हा नवीन दर 15 जून 2025 पासून लागू आहे. यापूर्वी बँक 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.7 % आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 3% व्याज देत होती, मात्र आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.