एसटी बस चे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट
15 percent discount on ticket fare for passengers who make advance reservations for ST, big announcement by Transport Minister,15 percent discount on ticket fare for passengers booking ST buses


एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, कोर्टाने वाढीव मतदानाची याचिका फेटाळली
ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
१ जुनला एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या आगाऊ आरक्षण करणाऱ्या संदर्भात घोषणा केली.
ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
यामुळे कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती,
त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
शिवसेना -मनसे युतीच्या हालचालीं तीव्र ; दोन बड्या नेत्यांमध्ये गुप्त भेट
येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो .
राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत उद्यापासून (१जुलै) लागू होत आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे एका महिन्यात 135 मृत्यू
तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.
मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर ,
ठाकरे बंधूंच्या ५ जुलै च्या मोर्चोला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही
npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५% सवलत प्राप्त करता येऊ शकते.
जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो.
शेतकऱ्यांनो तुमच्या सोलर पंपाचे वारा ,पाऊस किंवा इतर कारणाने नुकसान झाल्यास तक्रार करा
त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजना एसटीसाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येत आहे.
सोन्याच्या दरात घसरण ;गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
समजा, दादर ते स्वारगेट यादरम्यान ई शिवनेरी बसचे तिकिट ६०० रूपये आहे. जर गर्दी कमी असणाऱ्या हंगामात तुम्ही आधीच तिकिट बुक केले. तर हे तिकिट तुम्हाला ५१० रूपयांना मिळेल.