थेट आमदाराकडूनच कॅन्टीनवर काम करणाऱ्या वेटरला मारहाण

A waiter working at the canteen was beaten up by an MLA himself.,MLA Gaikwad came in a banyan-towel, washed the canteen employee; Devendra Fadnavis said, towel.

bj admission
bj admission

 

 

वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली.

 

 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला.

सरकारचा मोठा निर्णय; आता पत्नीचेही नाव लागणार सातबारावर

 

आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला.

 

 

आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं. पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली.

भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश

 

या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे.

 

 

कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा…अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली.

Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, निघाला मराठी मोर्चा

 

तसेच एका आमदाराने कसं राहावं, बनियन, टॉवेलवर-लुंगीवर आमदार येतो. रस्त्यावर राहताय का?, असंही अनिल परब म्हणाले. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही.

 

डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’

तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो.

 

 

त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले. तसेच अनिल परबजी टॉवेलवर मारलं किंवा कसंही मारलं, ते चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

 

पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना

काल (8 जुलै) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं.

 

 

मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं.

 

शिंदेंचे मंत्री पोहोचले मनसेच्या मोर्चात गो बॅक… गो बॅक… चे नारे देत मंत्र्याविरोधात जनआक्रोश…

यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी  सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली.

 

 

Related Articles