नोकरी लावून देतो म्हणून सव्वा कोटी रुपये लुबाडले; गळफास घेऊन आत्महत्या

He was robbed of Rs 1.25 crore in exchange for a job; he committed suicide by hanging himself.

bj admission
bj admission

 

 

 

नोकरीच्या आमिषांना बळी पाडून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. मात्र, जीएसटी विभागातील कर्मचाऱ्याने एकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

सरकारचा मोठा निर्णय; आता पत्नीचेही नाव लागणार सातबारावर

 

यामुळे मानसिक तणावातून नाशिकच्या अंबड येथील प्रवीण सोनवणे यांनी मामेभावाच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतःच्या मुलांसह नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी संशयित सचिन चिखले याला प्रवीण सोनवणे यांनी तब्बल सव्वा कोटी रुपये दिले.

 

 

मात्र, दोन वर्ष उलटून नोकरी नाही आणि पैसेही परत मिळाले नसल्याने प्रवीण सोनवणे यांनी मानसिक तणावातून मामेभावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

थेट आमदाराकडूनच कॅन्टीनवर काम करणाऱ्या वेटरला मारहाण

 

आत्महत्या पूर्वी प्रवीण सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून संशयिताचा त्यात उल्लेख देखील केला आहे.

 

 

सचिन चिखले याच्याविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांची बॅग घेऊन बसल्याचा आरोप

प्रवीण सोनवणे यांनी दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन संशयित सचिन चिखले यांना दिले होते.

 

मात्र, दोन वर्ष उलटून देखील पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी नाशिकच्या राजरत्ननगर येथे राहणाऱ्या मामेभावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक

 

माझ्या आत्महत्येस सचिन चिखले हे जबाबदार आहेत, असा मजकूर देखील त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण

सध्या सचिन चिखले हा फरार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पैसे घेतलेल्यांकडून सुरू असलेला दबाव आणि नोकरीचे आमिष दाखवून केलेली फसवणूक यामुळे प्रवीण सोनवणे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

 

 

दरम्यान, संशयित सचिन चिखले हा जीएसटी विभागात कर्मचारी असल्याची माहिती असून त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहे.

 

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

सचिन चिखले याने प्रवीण सोनवणे यांच्यासह आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

आत्महत्येपूर्वी प्रवीण सोनवणे यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

Related Articles