हैद्राबाद एअरपोर्टवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Emergency landing of plane at Hyderabad airport

bj admission
bj admission

 

 

हैद्राबादमध्ये एअर इंडिया एक्सप्रेच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनलवर ही घटना घडली आहे.

 

राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

एअर इंडिया एक्सप्रेसचे हैद्राबादवरुन थायलंडला जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. थायलंडला जाण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने उड्डाण भरले होते. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड करण्यात आले.

 

 

हैद्राबाद ते थायलंड या एअर इंडिया एक्सप्रेसच्य फ्लाईटचे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न

 

सकाळी ६.४० वाजता फ्लाईटने थायलंडमधील फुकेतला जाण्यासाठी उड्डाण केले होते. निर्धारित वेळेपेक्षा फ्लाईट २० मिनिटे उशिरा होती. मात्र उड्डाण करताच काही वेळाने तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’

 

हैद्राबाद वरून निघालेले विमान फुकेतला ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचणे अपेक्षित होते. मात्र उड्डाण केल्यावर पायलटला फ्लाईटमध्ये काहीशी अडचण जाणवल्याने त्याने विमान पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड केले.

 

अजित दादांच्या आमदाराला लाडकी बहीण योजना ठरतेय डोकेदुखी?

या फ्लाईटमधून किती प्रवासी प्रवास करत होते, व फ्लाईटमध्ये नेमका काय बिघाड झाला, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

 

 

Related Articles