फडणवीसांकडून कॉन्ट्रॅक्टरची खरडपट्टी

Fadnavis reprimands contractor

 

 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने, राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठकघेतली.

 

या बैठकीत त्यांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त केला, काँट्रॅक्टरांची चांगलीच खरडपट्टी केल्याचं दिसून आलं. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल झालेल्या बैठकीत

राज ठाकरें म्हणाले;’निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली’

अधिकारी आणि कंत्राटदारांवर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, जगात इतक्या धिम्या गतीने कुठेच काम होत नाही. पायाभूत सुविधांसंदर्भातील वॉररुम बैठकीत मुख्यमंत्र्‍यांचा हा रुद्रावतार दिसून आला.

 

कोण आहेत ते कॉन्ट्रॅक्टर, कोण त्याला उभं करा? का उशीर झाला ते सांगा आणि आता काय करणार आहात ते सांगा? असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, बहोत स्लो काम चला रहा है, एैसा नही चलेगा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची मोडली, जागेवरच खाली

आयएम नॉट हॅप्पी विथ दीस, या स्पीडने मी हॅप्पी नाहीये, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी एकेक प्रकल्पाचा बारकाईने आढावा घेतला असून

 

प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवूनच काम करा, पायाभूत सुविधा वॉररुमने सुद्धा दर तीन महिन्याने प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणूक;2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी
राज्यातील आणि एमएमआरडीच्या 21 प्रकल्पांसाठी आपण कम्प्लिशनची जी नियोजित तारीख दिलेली आहे, त्यातील जे प्रकल्प मागे पडले आहेत त्याच्या कंत्राटदारांनाही आपण बोलवलं होत.

 

त्यावेळी, कंत्राटदारांनीही काही अडचणी मांडल्या आहेत, अधिकाऱ्यांना सांगून त्या अडचणी सोडवायला आपण सांगितलं आहे. 5 ते 10 वर्ष प्रोजेक्ट्स चालतात ते आम्हाला मान्य नाही,

नेत्याने सांगून टाकल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा

प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण झाले पाहिजेत असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदारांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे.

 

 

Related Articles