न्यायमूर्ती सूर्य कांत बनले देशाचे 53 वे सरन्यायाधीश
Justice Surya Kant becomes the 53rd Chief Justice of the country

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारला आहे. काल (दि.23 नोव्हेंबर) रोजी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपला.
१६ मृत्यूंसाठी निवडणूक आयोग जबाबदार; राहुल गांधी
भूषण गवई यांनी निवृत्ती घेतल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे सरन्यायाधीश बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यां
ना शपथ दिली. सात देशांच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे.
काँग्रेसची, शरद पवार आणि ठाकरे गटाशी फारकत…
राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सूर्य कांत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.
राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,
दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब?
रसायने आणि खते मंत्री जे पी नड्डा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, नेते आणि माजी न्यायाधीश देखील उपस्थित होते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी आणखी एका कारणाने लक्षवेधी ठरला आहे.
पहिल्यांदाच न्यायमूर्तीच्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर सात देशांचे न्यायमूर्ती उपस्थित होते. यामध्ये भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग,
केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संधीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल,
१ डिसेंबर ते ३ मार्च दरम्यान २४ रेल्वे गाड्या रद्द
नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील. तब्बल १५ महिने त्यांच्याकडे हे पद असेल.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
अधिकाऱ्यांसाठी नवीन जीआर,आमदार-खासदार येताच उठून उभे राहा
त्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांनी हिसार येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर १९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी चंदीगडला गेले.
https://twitter.com/i/broadcasts/1ZkKzZdzwqvKv








