काँग्रेस नेताच म्हणाला भाजप लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकले

Congress leader himself said BJP won 400 seats in Lok Sabha elections ​

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी जर EVM संदर्भातील मुद्द्याचा निकाल लागला नाही तर भाजप ४००हून अधिक जागांवर विजयी होईल,

 

 

असे मत काँग्रेसचे नेता सॅम पित्रोदा यांनी मांडले.२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका या भारताच्या भवितव्याचा निर्णय करणाऱ्या असतील असे हे ते म्हणाले.

 

 

पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आगामी निवडणुका आणि ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. देशातील प्रत्येक व्यक्तीला मत दिल्यानंतर VVPAT मिळाले पाहिजे.

 

 

 

यावर निवडणूक आयोग काही तरी करेल असे वाटले होते म्हणून आपण वाट पाहिली पण जेव्हा त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळे आपल्याला बोलावे लागले.

 

 

निवडणूक आयोगाने ईव्हीएमवर उपस्थित करण्यात आलेल्या शंका नेहमीच फेटाळून लावल्या आहेत. काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी नेहमीच ईव्हीएममध्ये होणाऱ्या हेराफेरीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी १०० टक्के व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल(VVPAT)ची मागणी केली आहे.

 

 

 

सॅम पित्रोदा यांनी राम मंदिराबद्दल काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचे सांगितले. धर्म ही वैयक्तीक गोष्ट आहे आणि त्याला राजकारणाशी जोडू नये.

 

 

 

विरोधी पक्षांची आघाडी इंडियाकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांची निवड करण्यात आली नाही या प्रश्नाला उत्तर देताना पित्रोदा म्हणाले, इंडिया आघाडीकडून PM पदासाठी कोणाचेही नाव जाहीर केले नाही.

 

 

 

हा निर्णय आघाडीमधील सर्व पक्ष मिळून घेतली. याबाबत आम्ही ठरवले आहे की निवडणुकीनंतर त्याचा विचार करू. आता ६० टक्के लोकांना एकत्र करण्याचे लक्ष्य आहे, जे भाजपला मत देत नाहीत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *