मालेगावमध्ये इस्लाम पक्षाचे 3 हिंदू उमेदवार विजयी
In Malegaon, 3 Hindu candidates of the Islam party were victorious.

मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पार्टीने घवघवीत यश मिळवत प्रस्थापित पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. इस्लाम पार्टी 35 जागा जिंकत मालेगावातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगामध्ये मृत्यू
मात्र या निवडणुकीत इस्लाम पार्टीने मुस्लीम उमेदवारांसोबत हिंदू उमेदवार देऊन ते निवडूनही आणलेत. आणि इस्लाम पार्टीच्या या हिंदू कार्डमुळे भविष्यात हिंदुत्वाची कडवट भुमिका असलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मुबई महापालिका महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेचं मोठं विधान म्हणाले ‘देवा’ची इच्छा असेल तर…
मालेगाव महानगर पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारत 35 जागा मिळवल्या. मालेगावमध्ये इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीची युती करत सेक्युलर फ्रंटची स्थापनी केली होती.
इस्लाम पार्टीच्या 35 तर सपाचे 5 उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे इस्लाम पार्टी बहुमतापासून आता अवघ्या 3 जागा दूर आहे. त्यामुळे मालेगावात इस्लाम पार्टीचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे.
बापरे..! आता सरकार परस्पर नागरिकांच्या खात्यावरून पैसे काढून घेणार
इस्लाम पार्टीच्या नावातच इस्लाम असल्यामुळे या पक्षाचे सर्व उमेदवार मुल्सिम असतील असा समज होऊ शकतो. मात्र या निवडणुकीत इस्लाम पार्टीने 3 हिंदू उमेदवारांनाही संधी देत त्यांना मुल्सिम बहुल भागातून निवडूनही आणल्याचं पाहायला मिळतंय.
नावात इस्लाम असलं तरी मोठ्या नावात इंडियन सेक्युलर असा उल्लेख आहे. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. म्हणून आम्ही हिंदू उमेदवार देखील या निवडणुकीत विजय झालो असं मत इस्लाम पार्टीचे विजयी उमेदवार उद्धव दरेकर यांनी व्यक्त केलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा
मात्र भाजपच्या नेत्यांना हे मान्य नाहीय. इस्लाम पार्टी मुस्लिमांसाठीच बनलेली आहे. हिंदू मुस्लिम अशा दोन्ही मतदार असलेल्या प्रभागात हिंदू उमेदवार उभे केले म्हणून ते जिंकले. पूर्ण प्लॅन तयार करून ही इस्लाम पार्टी बनवली आहे. असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी मात्र इस्लाम पार्टीवर जोरदार निशाणा साधत पार्टीच्या हेतूवरच टीका केलीय.
इस्लाम पार्टीने मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत हिंदु उमेदवारांनाही संधी देत काही प्रमाणात हिंदू मत मिळवण्याचाही प्रयत्न केला. आणि त्यात यशस्वाही होताना पाहायला मिळाले..
राज्यात काँग्रेसचे पाच महापौर?
मुस्लिमांसोबतच हिंदू दलित मतांची मोट बांधल इस्लाम पार्टीच्या नेत्यांनी पक्ष सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. इस्लाम पार्टीच्या या हिंदूकार्डमुळे आगामी काळात कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची डोकेडुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.









