शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित?

Why the rush for the swearing-in ceremony? Whose political interests are behind this?

 

 

बुधवारी काळानं अजितदादांना हिरावलं. एका भीषण विमान अपघातात त्याचं निधन झालं. राज्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार कुटुंबिय अजूनही दु:खात असतानाच शुक्रवारी राजकीय घडामोडींना अचानक उकळी फुटली.

“या” जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पावसाचा

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी काल वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासोबतच राष्ट्रवादीची खाती पक्षाकडंच ठेवण्याची आग्रही मागणी केली.

 

तर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान अजून दुखवटा संपलेला नसताना इतकी घाई का करण्यात येत आहे

“या” जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पावसाचा

असा सवाल राज्यभरातून विचारल्या जात आहे. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या प्रकरणी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. त्यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपवर तोंडसुख घेतले आहे.

 

अजितदादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का ? यामागे कुणाचं राजकीय हित दडलंय असा मोठा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणताही असेल, तर तो भारतीय जनता पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे कधीही भाजपवासी व्हायला तयार आहेत असा खळबळजनक दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी संपवली जात आहे. यानंतर शिवसेनेलाही दाबलं जाईल असा आरोप त्यांनी केला.

 

भाजप राज्यातून सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा कट आखत आहेत. काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला, भाजप संपवणार आहे, असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला.

एका मेल वर 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

वित्त खातं देवेंद्र फडणवीस स्वत:कडे का ठेवत आहेत? फडणवीस काय स्वतःला सुपरमॅन समजतात का? सगळी खाती फडणवीस हे स्वत:कडे ठेवणार तर मग इतर काय करणार ? अशी टीका अंजली दमानिया यांनी केली. राज्यात नैतिकता उरलेली नाही असं वक्तव्य पण दमानिया यांनी केले.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे कार्यक्रम रद्द केले. ते सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी संध्याकाळी उपस्थित राहणार असल्याचे समजते.

डोनाल्ड ट्रम्प यांना झाला गंभीर आजार ? मोठी हेल्थ अपडेट समोर

लोक भवनात सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आजच्या कराडमध्ये प्रचार सभा रद्द करत ते शपथविधीला उपस्थित राहतील.

 

त्यामुळे आज संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार आहे हे निश्चित मानल्या जात आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार हे दीड तासापासून गोविंद बागेत होते. त्यांनी शरद पवारांची मनधरणी करत त्यांना शपथविधीसाठी आमंत्रण दिल्याचे समजते.

एका मेल वर 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Related Articles