रेल्वेने अचानक बदलले काही नियम, प्रवास करण्याआधी हे वाचा
Railways suddenly changed some rules, read this before traveling

भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. येत्या काळात तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हे नवे नियम तुम्हाला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय
रेल्वेने तत्काल तिकिटांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. IRCTC वेबसाइट किंवा अॅपवरून तिकीट बुक करण्यासाठी IRCTC खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं नाही ते तत्काल तिकीट बुक करू शकणार नाहीत.
सोन्या -चांदीमुळे कोट्यवधींचं नुकसान, जगभरात टेन्शन वाढले
सामान्य प्रवाशांना संधी मिळावी यासाठी एजंट बुकिंगवर मर्यादा घालण्यात आली आहे. तत्काल विंडो उघडल्यानंतर पहिले 30 मिनिटे एजंट बुकिंग करू शकणार नाहीत. AC कोचसाठी एजंट बुकिंग सकाळी 10.30 नंतर नॉन-AC (स्लीपर) साठी एजंट बुकिंग सकाळी 11.30 नंतर यामुळे सामान्य प्रवाशांना थेट तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी खरंच कट शिजवला गेला?
रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करणं बेकायदेशीर आहे. काउंटर तिकीट असो किंवा ऑनलाइन तिकीट वेटिंग किंवा रद्द झालेल्या तिकिटावर प्रवास केल्यास दंड आकारला जाऊ शकतो किंवा ट्रेनमधून खाली उतरवलं जाऊ शकतं.
सुप्रिया सुळें होणार सासू ,ची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं
रेल्वेने रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याच्या वेळेत बदल केला आहे. आता ट्रेन सुटण्यापूर्वी किमान 10 तास आधी चार्ट तयार होणार आहे. याआधी ही मर्यादा 4 तास नंतर 8 तास होती. यामुळे वेटिंग तिकीटधारकांना आधीच कळेल की तिकीट कन्फर्म झालं की नाही आणि प्रवासाचे पर्याय ठरवता येतील.
महापालिकेच्या १६ नगरसेवकांवर निलंबनाची मागणी
आता विमानप्रवासाप्रमाणेच रेल्वेतही कोचप्रमाणे सामान मर्यादा ठरवण्यात आली आहे. फर्स्ट AC – 70 किलो, सेकंड AC 50 किलो, थर्ड AC / स्लीपर – 40 किलो आणि जनरल कोच –30 किलो. मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास अतिरिक्त शुल्क किंवा कारवाई होऊ शकते.
जर प्रवासी आपल्या बोर्डिंग स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला नाही तर त्याची सीट थेट RAC किंवा वेटिंग तिकीटधारकाला देण्यात येईल. याआधी TTE पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होते पण आता तशी सवलत राहिलेली नाही.
ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा








