चक्क फेरीवाल्यांनीच अधिकाऱ्यांवर केला हल्ला, पळवून पळवून मारलं
The hawkers themselves attacked the officers, chased them away and killed them.
मुंबईच्या कांदिवली परिसरात शुक्रवारी फेरीवाल्यांच्या मोठ्या जमावाने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी काल संध्याकाळी कांदिवली लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.
शिंदेंनी दिली कबुली, इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता
त्यावेळी याठिकाणी जमलेल्या जमावाने त्यांच्यावर चाल करुन जात पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले आहे.
कांदिवलीतील या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत फेरीवाल्यांनी पालिका कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचे दिसत आहे.
पालिकेचे कर्मचारी रस्त्यावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई करत असताना याठिकाणी जमलेल्या प्रचंड जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.
राहुल गांधींचा शब्द खरा ठरला ,अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची ‘तात्पुरती परवानगी
अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा काल विधानसभेत गाजत असतानाच संध्याकाळी कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरामध्ये याच अनाधिकृत फेरीवाल्यांनी महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवरती हल्ला केल्याची घटना घडली.
यामध्ये काही महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांनी 12 ते 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
हल्ला करणारे हे क्रांती नगर मधील मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे या अनाधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
अधिवेशनात आमदाराची तब्बेत बिघडली ,रुग्णालयात हलवले
यासंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांनी काल जो हल्ला केला त्यातील हल्लेखोर हे मुस्लिम आणि बांगलादेशी आहेत.
यासंदर्भात कालच सभागृहात हा विषय मांडला होता. या सर्वांवरती कठोर कारवाई करण्यात यावी, असे मी आदेश दिलेले आहेत. महापालिकेत आमची सत्ता आहे आणि म्हणूनच यावरती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मी सांगितले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पातील फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती असा हल्ला कधीही खपवून घेतला जाणार नाही. कालच यावरती विधानसभेत लक्षवेधी झाली. सोमवारी मी पुन्हा एकदा हा मुद्दा लावून धरणार आहे.
हल्ला करणाऱ्यांच्या मागे राजकीय कोणी आहे का नाही माहिती नाही. मात्र, हल्लेखोरांमध्ये मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचे स्पष्ट आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ पुण्यापर्यंत









