रशियाने युद्ध सुरू असतानाच भारताबाबत घेतला मोठा निर्णय, अडचणी वाढणार

Russia took a big decision regarding India while the war was still going on, problems will increase

 

 

अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये सध्या भीषण यु्द्ध सुरू आहे. या यु्द्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या अनेक देशांना इंधन टंचाईचा मोठा फटका बसत आहे.

चंद्राबाबू सरकारची बम्पर योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार बक्षीस

भारताला देखील याची झळ काही प्रमाणात पोहोचली आहे. पाकिस्तानला तर मोठा दणका बसला असून, पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे तब्बल 60 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव

दरम्यान भारताला इंधन टंचाईचा फटका बसू नये यासाठी भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रशियानं देखील भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गॅंगवॉर आता नांदेडपर्यंत , नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोटाच्या फोनमुळे खळबळ

दुसरीकडे एक अशी बातमी देखील समोर आली होती की, अमेरिकेनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियाकडून 30 दिवस कच्च तेल खरेदी करण्याची सुट दिली आहे.

 

या बातमीमुळे भारतात मोठा गोंधळ उडाला होता. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र त्यानंतर अखेर आता यावर भारतानं प्रतिक्रिया दिली आहे,

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी वातावरण तापले

भारत सरकारने यावरून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं आहे. आम्हाला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, आमच्या राष्ट्राचं हीत जिथे आहे,

 

तिथून आम्ही किती प्रमाणात आणि कितीही दिवस कच्च्या तेलाची खरेदी करू शकतो असं भारतानं म्हटलं आहे. अमेरिकेनं 30 दिवसांची मुभा दिली मात्र त्यानंतरही गरज असेल तर रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच राहील असंही भारतानं म्हटलं आहे.

 

इराणचा इस्राईल,अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला
मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. रशियानं भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

 

मात्र पूर्वी कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारताला रशियाकडून मोठी सूट देण्यात येत होती. मात्र आता ही सूट मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. भारताला आता कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

इराणचा इस्राईल,अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला

रिपोर्टनुसार फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताला तेलाच्या खरेदीमध्ये प्रती बॅरलमागे तब्बल 13 डॉलरची सूट देण्यात आली होती. मात्र आता ही सूट मिळणार नसून कच्च तेल अधिक किंमतीने खरेदी करावं लागणार आहे.

 

हे तेल मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बंदरांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे भारतात इंधनाचे दर वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

इराणच्या धमकीने अमेरिकेला फुटला घाम

 

Related Articles