युद्धाचा परिणाम : अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण
Impact of the War: 30-40% Drop in Egg Prices

देशभरात अंड्यांच्या किमतीत अचानक 30 ते 40 टक्क्यांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. या बदलामागे स्थानिक कारण नसून मध्यपूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.
सध्या भारतीय पोल्ट्री उद्योगासाठी परिस्थिती अस्थिर बनली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे खाडी देशांकडे होणाऱ्या अंड्यांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.
1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहात अटक
दरम्यान निर्यात ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात अंडी देशांतर्गत बाजारात उपलब्ध झाली असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.
बाजारात अंड्यांची किंमत प्रतिअंडा सुमारे 7 रुपयांवरून घसरून 5 रुपयांपर्यंत आली आहे. म्हणजेच 100 अंडी सुमारे 500 रुपयांत उपलब्ध होत आहेत.
अवकाळीचे सावट, महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
किरकोळ बाजारातही अंड्यांच्या दरात घट झाली असून, पूर्वी 8 ते 9 रुपयांना विकले जाणारे अंडे आता 5.50 ते 6 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.
या घसरणीमागे मध्यपूर्वेतील वाढते तणावपूर्ण वातावरण कारणीभूत आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे आणि वाहतूक मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार आणि बहरेन यांसारख्या देशांशी होणारा व्यापार मोठ्या प्रमाणात बंद झाला आहे.
एकट्या बीड जिल्ह्यात २.८३ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले
उद्योगातील आकडेवारीनुसार, या संकटापूर्वी भारतातून खाडी देशांकडे दररोज सुमारे 1 कोटी अंड्यांची निर्यात केली जात होती.
विशेष म्हणजे भारतातील एकूण निर्यातयोग्य अंड्यांपैकी जवळपास 80 टक्के अंडी ही केवळ खाडी देशांकडे पाठवली जात होती. मात्र सध्या निर्यात थांबल्यामुळे हा मोठा साठा देशांतर्गत बाजारात आणला जात आहे. ज्यामुळे पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला आहे.
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे भारतात ECA कायदा लागू , नेमकं काय आहे कायदा
या परिस्थितीत व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत असला तरी सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. किमती कमी झाल्यामुळे
अंड्यांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. महागाईमुळे अंडी खरेदी कमी केलेल्या अनेक कुटुंबांनी आता पुन्हा अंड्यांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात केली आहे.
एकट्या बीड जिल्ह्यात २.८३ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले
अंडे हे पोषणमूल्यांनी समृद्ध अन्न मानले जाते. ज्यामध्ये व्हिटॅमिन A, D, E, B12 यांसह आयर्न आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते.
प्रति 100 ग्रॅम अंड्यामध्ये सुमारे 12.6 ग्रॅम प्रथिने आणि 155 कॅलरीज असतात. त्यामुळे ते संतुलित आणि किफायतशीर आहाराचा उत्तम पर्याय ठरते.
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; बर्फवृष्टीचा अंदाज








