राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले भोंदू खरातकडे का गेले ?

Radhakrishna Vikhe Patil explained why he went to the charlatan Kharat.

 

 

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला महिलांचे लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात काही राजकारणी लोकांचीही नावे असल्याचे समोर आले आहे.

मोदी सरकारच्या विरोधात राज ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा

यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे अशोक खरातच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे.

 

तसेच इतरही अनेक नेत्यांशी संबंधित लोक खरातच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू खरातबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, पहिला गुन्हा आम्ही दाखल केला, म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं. आता जी नावे समोर येत आहेत, त्यांची SIT चौकशी करेल.

महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात काही ठिकाणी शळांना सुट्टी;नागरिकांना सतर्कतेचं आवाहान

त्याने एक अवतार धारण केला होता, तो अवतार समोर आला आहे. त्यासाठी लोकांना दोष देऊ नये. अनेक महिला या त्याच्या वलयाला बळी पडल्या. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप चौकशीत समोर येतील. अनेकांचे पाय धुताना फोटो आहेत, भाषण करताना नावं आलेले आहेत.

 

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार होतो आहे असं म्हणून शिर्डीतील काही लोक बळी पडले. समता पतसंस्था प्रकरणात जबाब नोंदवले गेले आहेत.

सरसगट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही :पात्रतेबाबत अजूनही संभ्रम

खरात स्वतः अकाउंट उघडायचा आणि ऑपरेट करायचा याबाबत गोष्टी चौकशीत समोर येईल. अनेक महिलांना फसवण्यात आलं.

 

अज्ञानाने घडलेल्या गोष्टी आणि माहिती असून तिथे जाणं यात फरक आहे. माहिती असताना कोणी गेल नसतं. इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आलं, तर आधी त्याचं भविष्य बघावं लागेल.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका

अंजली दमानिया यांच्याकडे भरपूर माहिती असेल, रोज नवीन प्रकार समोर येत आहेत, आरोप होत आहेत. SIT चौकशी करत आहे. जे दोषी असतील, ते मोठ्या पदावर असले तरी कारवाई झाली पाहिजे. दीपक केसरकर यांचा आग्रह होता,

 

म्हणून मी गेलो होतो. काही गोष्टी अज्ञानाने झाल्या आहेत, IG त्या ठिकाणी गेले, अनेक लोकांचे CDR आहेत, मात्र चौकशी निष्पक्ष होणार आहे. IG गेले, मात्र जाणीवपूर्वक कोणी गेलं तर ते गंभीर आहे. माझं भविष्य लोक ठरवतात. मी हात दाखवून अवलक्षण करत नाही.

मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकल्या

 

Related Articles