सुप्रिया सुळे म्हणजे लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी
Supriya Sule is a beneficiary of the 'Ladki Lek' scheme.

शिवसेना ही ठाकरेंची आहे. शिवसेना यापूर्वी ठाकरेंचीच होती, आजही आहे उद्याही राहील, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी पलटवार केला आहे. शिवसेना कोणाची यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून म्हणतात.
राष्ट्रवादी कडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी जबाबदारी
आपला पक्ष सांभाळता येतं नाही आणि लोकांना शहाणपणा शिकवता? असा सवाल करत वाघमारेंनी सुळेंवर जोरदार हल्लाबोल चढवला.
सुप्रिया ताई सोन्याचा चमचा घेऊन तुम्हीच जन्माला आलात. खासदार आमदार सगळं तुम्हाला आयतं मिळालं आहे. तुमचं स्वतःच कर्तृत्व काय आहे? असा सवाल वाघमारेंनी उपस्थित केला.
MPSC चा टॉपर पण अडकला लाचेच्या जाळ्यात
लोकांनी जनमत देऊन शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे सुरक्षित असल्याचे सांगितल्याचे वाघमारे म्हणाल्या. सुप्रिया ताई तुम्ही सुद्धा लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी आहात अशी टीका वाघमारेंनी केली.
तुमच्या सारख्या घराणेशहीतून आलेली लोक घराणेशाईचे समर्थन करतात. शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची हे महाराष्ट्रने मान्य केल्याचे वाघमारे म्हणाल्या.
सुप्रियाताई शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची कन्या म्हणून तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. खासदार, आमदार सगळं तुम्हाला आयतं मिळालं,तुमचं स्वतःच कर्तृत्व काय आहे? पण एकनाथ शिंदेंनी स्वत:चं नेतृत्व स्वत:च्या कर्तृत्वाने उभं केलं आहे.
एनडीए आधाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष फुटणार? ; राजकारणात खळबळ!
शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी आणि सर्वात महत्त्वाचं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा दिला असल्याचे ज्योती वाघमारे म्हणाले.
तुमच्यासारख्या घराणेशाहीतून आलेली माणसं घराणेशाहीचेच समर्थन करतात. पण याद राखा हा देश घराणेशाहीवर चालत नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवर आणि लोकशाहीवर चालतो.
शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचीच हे महाराष्ट्रने मान्य केलं आहे. सुप्रियाताई तुम्ही तुमच्या घरात काय जळतंय, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघावं अशी टीका ज्योती वाघमारेंनी केली.
खरी शिवसेना कोणाची आज सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?निकाल लवकरच
शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. विधानसभेच्या सभापतींनी दिला आहे. तसेच जनतेच्या न्यायालयाने देखील दिला असल्याचे ज्योती वाघमारे म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षीत असल्याचे मत वाघमारे यांनी व्यक्त केले.








