MPSC सचिव सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळे फासले
Black substance smeared on MPSC Secretary

एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडने काळं फासल्याची घटना समोर आली आहे. एमपीएससीच्या पेपरफुटीवरुन संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नवी मुंबईत ही घटना घडली.सदर घटनेनंतर MPSC चा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या व महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्यावतीने संभाजी ब्रिगेडने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि नालायक सरकारच्या तोंडाला काळं फासलं आहे. महेंद्र हरपाळकरच्या जी थोबाडीत मारली आहे ती या सरकारला जनतेच्यावतीने संभाजी ब्रिगेडने मारलेली थप्पड आहे,
आता वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलिंडर मोफत
अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली. MPSC औषधं निरीक्षक पेपर फुटी संदर्भात संभाजी ब्रिगेडने 3 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया सामोरं आंदोलन केले होते. त्याचवेळी सरकारला आम्ही इशारा दिला होता. मात्र सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे,
त्यांना ज्या भाषेत समजत त्या भाषेत सांगितलं पाहिजे. MPSC चे अध्यक्ष व सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही तर पुढचा नंबर हा MPSC अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही, असा इशारा देखील संतोष शिंदे यांनी दिला आहे.
डीजेच्या दणदणाटामुळे थेट मंत्र्यालाच बहिरेपण
एमपीएससीच्या माध्यमातून अध्यक्ष आणि सचिव आणि त्यांची जी भ्रष्टाचारानं बरबटलेली टीम आहे, त्यांनी तरुणांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचं ठरवलं आहे.तरुण आत्महत्या करत आहेत, त्याची प्रतिक्रिया आहे. प्रश्नपत्रिका फोडली जात आहे, सरकार आंधळं आणि बहिरं आहे,
त्याची ही प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्रात तरुणांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. संभाजी ब्रिगेडनं आज केलेली कारवाई झाकी है, अध्यक्ष अभी बाकी है, मुलं मरत आहेत, असं संतोष शिंदे यांनी म्हटलं. आज प्रश्नपत्रिका फुटत असतील, परीक्षा रद्द होत असतील तर किती वर्ष वाट बघायची असं संतोष शिंदे यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
सदर घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. शाईफेक करणे दुर्दैवी आहे. आमचे कार्यकर्ते विकास लवांडे यांनाही असंच शाईफेक केली होती,
त्याचाही आम्ही निषेध केला होता. लोकशाहीमध्ये आंदोलन करुया, चर्चा करुया आणि त्यातून मार्ग काढला जाऊ शकतो, पण शाईफेक करणे योग्य नाही. एमपीएससीबाबत रोहित पवार आंदोलन करत आहेत.
जरांगे पाटील- भुजबळ यांच्यात पुन्हा जुंपली
आम्ही पक्षाचं राजकारण करतोय असं नाही तर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. काळं फासणे वगैरे हे मला स्वत:ला सुसंस्कृत वाटत नाही. लोकशाहीत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत राहून मार्ग काढूया.
MPSC बाबात मुख्यमंत्र्यांनी काल विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्यातून ज्या गोष्टी आहेत, त्यावर काही आक्षेप असेल तर चर्चा करावी, त्यातून मार्ग काढला जाऊ शकतो, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.









