जरांगे पाटील- भुजबळ यांच्यात पुन्हा जुंपली
Clash erupts again between Jarange-Patil and Bhujbal.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलंय. उद्या म्हणजे 12 सप्टेंबर रोजी दुपारी मुंबईला जाण्याचा निर्णय आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
महापूराने नेस्तनाबूत केल्यावरही नेपाळने नाकारली भारताची मदत?
त्यामुळे, ही मराठा समाजासाठी अस्तित्वाची लढाई असल्याने केवळ टीव्हीसमोर बसून बघू नका, हातातील कामं टाकून या, असेही जरांगे पाटलांनी म्हटले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या भाषेवरुन ओरड होत असून मंत्री छगन भुजबळ यांनीही जरांगे पाटलांची भाषा घाणेरडी असल्याचं म्हटलं. आता, त्यावरुन जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर पलटवार केला आहे.
सरकारचे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे पाहत आहे, व्यवस्थेचे काम आहे. योग्य अयोग्य काय आहे, याकडे यंत्रणा लक्ष देतील. लोकशाहीत आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे.
मनोज जरांगेंचा सरकारला थेट निर्वाणीचा इशारा
त्यांनी घोषणा केली, प्रत्यक्ष काय होतं, पाहावंलागेल. सोयी-गैरसोयी पाहाव्या लागतात. सर्वजण सांगून सांगून दमले आहेत. आता मी काय सांगणार. एक शिष्टमंडळ भेटायला जाणार होतं. त्यांनी नकार दिला,
त्यामुळे ते गेले नाहीत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. तसेच, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.
त्यावेळी, मनोज जरांगे यांनी घाणेरड्या भाषेतून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ती महिला नरवस झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे,
आता वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलिंडर मोफत
संजय शिरसाट यांना कोणत्या भाषेत बोलतात’, असे म्हणत भुजबळ यांनीही जरांगेंच्या भाषेवरुन टीका केली होती. आता, जरांगे पाटलांनी भुजबळांच्या या टीकेवरुन पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना वापरलेल्या भाषेवरुन टीका केली होती.
आता, जरांगे पाटलांनी भुजबळांच्या या टीकेवरुन पलटवार केला आहे. कशाला काडी लावतो, तुला शिव्या देऊ का मग, तुला काय करायचे, कुठवर काड्या लावतो. कलेक्टर सगळ्या जिल्ह्याच्या आहेत, त्यांना राग येत असेल तर, त्या पालक आहेत, त्या राजकारणी थोड्याच आहेत, असे म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांवर प्रहार केला.
जिल्हाधिकाऱ्यांना कोणी पण बोलू शकते, वाईट पण चांगले पण, त्या महिला असल्या तरी जिल्ह्याच्या मालक आहेत. बोलू शकते म्हणजे मीडियाने गैरअर्थकाढू नये, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. जनतेच्या मालकाला हे सहन करावे लागते, सहन करत नसेल तर त्या जातीयवाद करत आहेत, असा त्याचा अर्थ होतो.
डीजेच्या दणदणाटामुळे थेट मंत्र्यालाच बहिरेपण
सक्षम अधिकारी असल्यावर तिथे लिंग हा विषय येत नाही. संसारात लिंग भेद असतो, अधिकाऱ्यात लिंग भेद नसतो. कारण, त्या जिल्ह्याच्या मालक असतात, त्यांना ऐकावे लागते असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपल्याला भाषेवरुन टीका करणाऱ्यांवर पलटवार केला.
दरम्यान, अजय बारस्कर यांच्याकडून मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्यावरूनही जरांगे पाटलांनी भूमिका मांडली. केस करणारे,
माझ्या विरोधात बोलणारे मराठ्यांचे आहेत की नाही असा संशय आहे. मला विरोध करणारे खरच मराठे आहेत का? ओरिजनल असेल तर मराठे मराठ्यांच्या विरोधात बोलू शकत नाहीत, दुकानात भेसळ असेल तर काय सांगता, असे जरांगे यांनी म्हटले.
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
मुंबईची तारीख ठरली तर आम्ही एका दिवसात जाऊ, ते गर्दीवर अवलंबून आहेत. गाड्या जास्त असतील तर 10-20 च्या स्पीडने चालतील, मागच्या दोन्ही वेळेच्या 25 पट अधिक मराठे मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.









