जगावर कोरोनापेक्षाही मोठे संकट; हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट

A crisis greater than COVID-19 facing the world; thousands dead, WHO issues high alert.

 

 

 

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये इबोला व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. कांगोमधील सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील तब्बल सात हजार लोकांना इबोलाची लागण झाली आहे.

जरांगे पाटील- भुजबळ यांच्यात पुन्हा जुंपली

तर आतापर्यंत या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 3398 वर पोहोचला आहे. इबोला व्हायरसचा हा बुंडीबुग्यो नावाचा व्हेरियंट आहे, हा अतिशय वेगाने देशभर पसरत आहे.

 

कांगो देशाच्या इतिहासात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव झाला नव्हता. कोरोनाचा देखील एवढा प्रादुर्भाव या ठिकाणी पहायला मिळाला नव्हता.

MPSC सचिव सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळे फासले

दरम्यान कांगोमध्ये 2018-2020 मध्ये देखील अशाच प्रकारची इबोलाची साथ आली होती. मात्र गेल्यावेळेपेक्षाही यावेळी इबोलाची साथ देशात झपाट्याने पसरली आहे.

 

सुरुवातीला मे 2026 मध्ये कांगोच्या इटुरी प्रातांमध्ये या आजाराचे काही रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर हा आजार देशभरात झपाट्याने पसरला. तज्ज्ञांच्या मते जानेवारीपासूनच कांगोमध्ये या आजाराची साथ आली होती.

 

आतापर्यंत तब्बल सात राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे इबोला व्हायरस आता कांगोच्या दक्षिण उबांगी प्रांतापर्यंत पोहोचला आहे. दक्षिण उबांगी प्रांत हा कांगोच्या उत्तर -पश्चिममध्ये स्थित आहे.

ओबीसींना खुल्या गटात टाकण्याचा डाव; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सुरुवातीला ज्या प्रांतामध्ये इबोलाचा प्रादुर्भाव झाला त्या प्रांतापासून दक्षिण उबांगी प्रांत हा शेवटच्या टोकाला आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की सध्या इबोला हा संपूर्ण देशातच पसरला आहे.

 

इबोलाच्या या नव्या व्हेरियटंचा मृत्यूदर देखील अधिक आहे. आजाराची लागण झालेल्या शंभर लोकांपैकी जवळपास 38 लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे.

शाळेत विद्यार्थ्यांना कांदा-लसूण, खाण्यावर बंदी

विशेष म्हणजे इबोलाच्या या आधीच्या आजारावर जी लस दिली जात होती, ती लस या नव्या व्हेरियंटवर फारशी प्रभावी नसल्याचं देखील समोर आलं आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेकडून कांगोमध्ये इबोलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे, अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतरही देशात या आजाराची साथ पसरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे,

 

 

Related Articles