आदित्य ठाकरेंची दिशा सालियन प्रकरणावर 6 वर्षांनी पहिली प्रतिक्रिया
Aditya Thackeray's first reaction to the Disha Salian case after 6 years.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही, असं म्हटलं आहे. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे,
असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या चर्चांनंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
१३ तास संकटाचे, महाराष्ट्रासह २६ राज्यांना हवामान खात्याचा इशारा
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
ओबीसींना खुल्या गटात टाकण्याचा डाव; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी…
शाळेत विद्यार्थ्यांना कांदा-लसूण, खाण्यावर बंदी
दिशा सालियन प्रकरण नेमकं काय? दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती. तिने 8 जून 2019 ला 12 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर 14 जून 2019 ला अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं देखील आत्महत्या केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिशाच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल झाली आहे.आरोपी म्हणून एफआयआरमध्ये कोणाचं नाव नाही. एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतरांचा उल्लेख आहे.









