तहसीलदारांच्या कक्षातच विषप्राशन; शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Poisoning in Tehsildar's room; The extreme step of the farmer

 

 

 

 

नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतात पाणी शिरून नुकसान होत असल्याने शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार केली. आपल्या तक्रारीची दखल तहसीलदारांनी घ्यावी म्हणून अनेकदा प्रयत्न केले.

 

 

 

यश आले नाही. शेवटी नैराश्याने गाठलेल्या शेतकऱ्याने तहसीलदारांच्या कक्षातच विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

यातूनही प्रश्न सुटला नाही पण, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यावरून शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

गौतम गेडे रा. जवळा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

गौतम यांची जवळा येथे शेती आहे. त्यांच्या शेताजवळून वाहत असलेल्या नाल्याचा मार्ग बदलल्याने पुराचे पाणी शेतात येऊ लागले. यंदा तर शेतजमीन खरडून गेली.

 

 

प्रचंड नुकसानीमुळे उद्ध्वस्त झालेल्या गौतम यांनी पुरामुळे आपले नुकसान थांबविण्यासाठी नाल्याचा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी आर्णीचे तहसीलदार परसराम भोसले यांच्याकडे केली.

 

 

 

आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार तहसील कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. तक्रारीची दखल कुणीही न घेतल्याने दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या कक्षात विषप्राशन केले.

 

 

तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी गौतम यांना रुग्णालयात दाखल करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी शेतकऱ्यावर झालेल्या कारवाईबद्दल तीर्व नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तहसीलदार परसराम भोसले यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

 

 

याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी न घेतल्यास आर्णीच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही तुपकर यांनी दिला आहे .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *