भारतीय विमान अफगाणिस्तानात क्रॅश झाले
Indian plane crashes in Afghanistan
भारताहून रशियाकडे जाणारं एक विमान अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.
तेथील स्थानिक माध्यम टोलो न्यूजने याबाबत माहिती दिली आहे. बदख्शां प्रांताच्या माहिती व सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबत माहिती दिल्याचं टोलो न्यूजने म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान भारतातून मॉस्कोकडे निघालं होतं. अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये हे विमान कोसळलं. येथील पोलिसांनी सांगितलं,
की हे विमान काल रात्री रडारवरुन अदृश्य झालं होतं. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे विमान क्रॅश झालं. तालिबानने याची पुष्टी केली आहे.
बदख्शां प्रांतातील माहिती मंत्रालय प्रमुखांनी सांगितलं, की याबाबत अधिक तपास करण्यासाठी एक शोधपथक पाठवण्यात आलं आहे. या अपघाताबाबत भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारत सरकारच्या सूत्रांनुसार, सर्व शेड्यूल केलेल्या फ्लाईट्स या निश्चित वेळेत सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे क्रॅश झालेलं विमान हे चार्टर्ड प्लेन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतात रविवारी एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली. बदख्शां प्रांतात कोसळलेलं विमान हे भारतीय विमान असल्याचं सांगण्यात येत होतं.
मात्र , DGCA च्या अधिकाऱ्यांनी हे विमान भारताचं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच विमान अपघातातील जीवितहानीविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘अफगाणिस्तानात कोसळलेलं विमान हे शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होतं. या विमानात सहा प्रवासी होते.
हे विमान फ्रान्समध्ये तयार करण्यात आलं होतं. या विमानाचं नाव फॅक्लन १० जेट होतं. हे चार्टर विमान भारताहून उज्बेकिस्तानच्या मार्गे मॉस्को येथे येत होते’.
दुसरीकडे केंद्र सरकारने स्पष्ट केलं की, अफगाणिस्तानातील दुर्घटना दुर्देवी आहे. कोसळलेलं विमान एअरक्राफ्टचं एक चार्टर विमान आहे. या विमानाची नोंदणी मोरक्का येथे झालेली आहे.
अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या प्रमुखाने सांगितलं की, हे विमान कुरान-मुंजान आणि जिबाक जिल्ह्याजवळील तोफखान्याजवळील डोंगराळ भागात कोसळलं.
ही दुर्घटना घडल्यानंतर एक पथक तपास रवाना झालं आहे. स्थानिकांचा दावा आहे की, विमान रविवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली’.