आमदार अपात्रता प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची धक्कादायक माहिती

Shocking information of Jitendra Awad in MLA disqualification case ​

 

 

 

 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरण प्रलंबित आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मागच्यावर्षी फूट पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले. शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो,

 

 

तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. शिवसेनेसारखचं हे प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

 

 

 

या सुनावणीवेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

 

 

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले आहेत, असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्रता सुनावणीवेळी केलं आहे.

 

 

 

महत्त्वाची कागदपत्रे कपाटात ठेवली होती, ती गायब झाली आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *