देशातील टॉप 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीत कोण पहिल्या क्रमाकांवर ? एकनाथ शिंदे कोणत्या क्रमाकांवर?
Who is on the first rank in the list of top 10 chief ministers of the country? Eknath Shinde on which ranks
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टु़डे’ने मूड ऑफ नेशन’च्या माध्यमातून एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या माध्यामातून जनतेची मते जाणून घेतली आहेत.
या माध्यमातून देशातील १० लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याबाबत सर्व्हे केला गेला आहे. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सामावेश आहे.
‘मूड ऑफ नेशन’च्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं स्थान यादीत पहिल्या स्थानी आहे. या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना ४६.३ लोकांनी पसंती दर्शवली आहे.
याआधी देखील ऑगस्टमध्ये एक सर्व्हे घेण्यात आला होता. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना ४३ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पंसती दर्शवली होती.
या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. अरविंद केजरीवाल यांना १९.६ लोकांनी पसंती दर्शवली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ८.४ लोकांची पसंती मिळाली आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना ५.५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. नवीन पटनायक यांना २.५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
या सर्व्हेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या २. ३ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा यांना २ लोकांची पसंती मिळाली आहे. तर या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांना १.९ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना ०.५ टक्के मते मिळाली आहेत. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांना ०.४ टक्के लोकांनी पंसती दर्शवली आहे.