भाषणादरम्यान कार्यकर्ता ओरडला ‘दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा,’अजित पवार असं बोलले कि ,कार्यकर्ता झाला गप्प
During the speech, the activist shouted 'Dada, you become the chief minister', Ajit Pawar said that the activist became silent
अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि आमदारांची भावना आहे.
अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये नेत्यांकडून ही भावना बोलून दाखवली जात आहे. अजित पवारांना या उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना जरा धीर धरा असा सल्ला काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत दिला होता.
पण त्यानंतरही कार्यकर्ते मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आज तर बारामतीत थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनीही भन्नाट उत्तर दिलं.
अजित पवार बारामतीत असून यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण सुरु असतानाच एक कार्यकर्ता ‘दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा’ असं ओरडला.
त्यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भन्नाट ‘तू चंद्रावर जा आणि मला मुख्यमंत्री व्हायला सांग’ असं उत्तर दिलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
“मी खोटं बोलत नाही. मी थोडा कडक शिस्तीचा आहे. पण काम चोख करुन घेतो. आपण अनेकांना संधी दिली असून, त्यांनी संधीचं सोन केलं.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं की बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता आपला कणा आहे. तुमच्या आजुबाजूला बसलेला आम्हाला मदत करत नाही अशी तक्रार केली जाते.
प्रत्येकाचं बोलणं, करणं प्रत्येकाला आवडेल असा माझा दावा नाही. माझ्यावरही काहीजण समाधानी नसतील. पण आपण प्रत्यकेजण समाधानी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे,” असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलं.
“पाचव्यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी असताना राज्यासह आपल्याही तालुक्याला मदत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.
मी जरी सतत बारामतीत येत नसलो तरी कारखाने कसे सुरु आहेत, येथील प्रश्न, अपेक्षा यांची जाणीव आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“बारामती नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
निवडणुका घेता येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी अस्वस्थता आहे,” असं ते म्हणाले. वरिष्ठांकडून निर्णय घेतला जात नसल्याने 2 जुलैला आम्ही निर्णय घेतला असंही त्यांनी सांगितलं.