गौतम अदानींची दिवाळी काळी ;१३० अब्ज डॉलरहुन अधिक नुकसान

Gautam Adani's loss during Diwali: more than 130 billion dollars

 

 

 

 

#Gautam Adaniदेशातील दुसरे सर्वात जास्त श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी यावर्षी संपत्ती गमावण्यात आघाडीवर आहेत. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या अमेरिकी शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे

 

 

 

गौतम अदानी आणि अदानी समूहाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गने केलेल्या शेअर्सच्या किमतीत केलेले फेरफारचे आरोप फेटाळून लावले असले तरी समूहाच्या शेअर्समधील पडझड अजूनही कायम आहे.

 

 

 

गेल्या काही महिन्यात स्टॉक्सच्या घसरणीमुळे अदानी समूहाला १३० अब्ज डॉलरहुन अधिक नुकसान सोसावे लागले आहे.

 

 

 

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी जगातील जगातील पहिल्या १० अब्जाधिशांपैकी एक असलेले गौतम अदानी १२ नोव्हेंबरपर्यंत २१ व्या क्रमांकावर घसरले होते.

 

 

 

ब्लूमबर्ग इंडेक्सच्या अहवालानुसार YTD म्हणजे वर्ष-दर वर्ष गौतम अदानींच्या संपत्तीत ६० अब्ज डॉलरची घट झाली आहे.

 

 

 

देशभर दिवाळीचा सण साजरा केला जात असताना गौतम अदानी सर्वाधिक नुकसान झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत.

 

 

ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार गौतम अदानींची एकूण संपत्ती ६०.६ अब्ज डॉलर असून ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत २१ व्या स्थानावर आहेत. तसेच अदानींना झालेला तोटा पाहिल्यास यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये त्यांची एकूण संपत्ती अर्ध्याने कमी झाली आहे.

 

 

 

 

अमेरिकी शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने यावर्षी जानेवारीत एक अहवाल जारी करत अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते.

 

 

 

शेअर्सच्या किमतीत फेरफार, तसेच शेल कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला होता.

 

 

 

त्यानंतर गौतम अदानींनी स्वतः समोर येऊन आरोप फेटाळले असले तरीही शेअर्समधील पडझड काही थांबली नाही. शेअर्सच्या घसरणीमुळे अदानी समूहाला १३० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे.

 

 

 

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुप रिकव्हरीच्या रुळावर असून अजूनही अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. हिंडेनबर्गच्या

 

 

आरोपांची सेबीकडून कसून चौकशी सुरू आहे तर, वेळोवेळी इतर अहवालही प्रसिद्ध झाल्यामुळे अदानींच्या अडचणीत भर पडली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *