शरद पवार रायगडावरुन करणार पक्षाच्या नव्या चिन्हाचे लॉन्चिंग

Sharad Pawar will launch the party's new symbol from Raigad

 

 

 

 

 

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळाले. काल निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही देण्यात आले आहे.

 

 

 

 

नवे चिन्ह घेऊन निवडणुकांच्या रणांगणात उतरण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. या नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी

 

 

 

शरद पवार गटाकडून खास सोहळा आयोजित करण्यात आला असून रायगडावरुन शरद पवार गट लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी उद्या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचे लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

 

 

 

 

उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

 

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज

 

 

निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी,

 

 

आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *