भाजपच्या दबावामुळे पुत्राची उमेदवारी वाचविण्यासाठी शिंदेंची धडपड

Shinde's struggle to save his son's candidacy due to BJP pressure

 

 

 

 

 

कल्याण लोकभेसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे सस्पेन्स कायम आहे. शिंदेसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी २ दिवसांपूर्वीच जाहीर झाली.

 

 

 

 

त्यात ८ जणांचा समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील दोन वेळचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते.

 

 

 

 

त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले आहे. तर कल्याण किंवा ठाणे यापैकी एका जागेसाठी भाजप आजही आग्रही असल्याचे बोलले जात आहॆ.

 

 

 

शिवसेनेने कल्याण मतदारसंघाऐवजी ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि भाजपला कल्याणची जागा सोडावी, अशी चर्चा

 

 

 

 

सेना – भाजपमध्ये झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप व शिंदेसेनेत रस्सीखेच अजूनही सुरु आहे, हे दिसून येते.

 

 

 

 

 

ठाण्यावर भाजपने दावा केला आहे. शिंदे यांनी ठाणे सोडले तर दिवंगत आनंद दिघे यांनी संघर्ष करून मिळवलेला ठाणे मतदारसंघ त्यांचेच शिष्य असलेल्या शिंदे यांना राखता आला नाही,

 

 

 

 

 

असा संदेश जाईल आणि ठाकरे गट त्याचे भांडवल करेल. त्यामुळे शिंदे गट ठाणे सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत कल्याण लोकसभेवर भाजप दावा करेल अशीही चर्चा आता रंगू लागली असून

 

 

 

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासारखा उमेदवार भाजपकडे आहे किंवा भाजप दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी देऊन लोकसभेला निवडून आणेल.

 

 

 

 

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहे. कल्याण-डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. इथेही संघाचीही चांगली ताकद आहे.

 

 

 

कल्याण लोकसभेत मनसेचा एक आमदार असून राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजही राज ठाकरे यांची क्रेझ टिकून राहिली आहे.

 

 

 

 

 

मुंबईला लोकलमधून कामाला जाणारा मोठा वर्ग हा मनसेच्या पाठीशी दिसतो. तर गेल्या अनेक वर्षापासून भाजप – शिवसेना सत्तेत असले तरी पाहिजे तसा विकास करु शकले नाहीत.

 

 

 

 

त्यामुळेच मनसेने वारंवार विरोधात आवाज उठवल्याने मनसेने विरोधी पक्षाची स्पेस पूर्ण घेतली आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेत मनसेची भूमिका आणि मते किंगमेकर ठरणार आहेत.

 

 

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसेही महायुतीत जाईल असे चित्र आहे. मात्र कल्याण लोकसभेबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

 

 

 

 

सध्या भाजप आणि शिवसेनेमधील रस्सीखेच पाहता मनसेने शांतपणे काय होते, कोणाला उमेदवारी दिले जाते, याकडे लक्ष ठेवून आहे.

 

 

 

 

कल्याण लोकसभेत उमेदवार दिल्यावरच आपली भूमिका मनसे जाहीर करेल, असे सांगण्यात येते. मनसेला कल्याण लोकसभेत सुमारे दीड लाखाच्या आसपास मतदान होऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *