उमेदवारी वाचविण्यासाठी हेमंत पाटील ताफ्यासह मुंबईकडे रवाना ,काय म्हणाले बांगर ?

Hemant Patil left for Mumbai with a convoy to save his candidacy, what did Bangar say?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा तोंडावर आला तरिही अद्याप महायुतीचं जागावाटपाचं रहाटगाडगं सुरूच आहे. अशातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

 

हिंगोलीतील नाराज हेमंत पाटील समर्थक आज मुंबईला रवाना होणार आहेत. 250 ते 300 गाड्यांच्या ताफ्यासह समर्थक मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.

 

 

 

हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवावी, अशी मागणी हे समर्थक करणार आहेत. हिंगोली, यवतमाळ-वाशिम आणि नांदेड

 

 

 

या तीनही जिल्ह्यातील हेमंत पाटील समर्थक मुंबईत येणार आहेत. आता यासर्व घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मला विचारलं, त्यावेळी मी सांगितलं की, मला लोकसभा लढवायची नाही,

 

 

 

 

मी माझ्या विधानसभेत खूश आहे. जो निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, तो सर्व शिवसैनिकांना मान्य आहे. हेमंत पाटलांचे समर्थक

 

 

 

मुंबईला जात-येत आहेत, अशी मला अजून माहिती नाही आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला, त्याचं शिवसैनिक पालन करतील.”

 

 

 

“त्यांनी (भाजप ) उमेदवारी मागितली होती, त्यांना वाटलं होतं की, भाजपला जागाच सुटावी. अमित शहा यांनी शब्द दिला होता की, ही जागा शिवसेनेलाच राहणार आहे,

 

 

 

तो शब्द त्यांनी पाळला, ही जागा शिवसेनेकडेच राहिलेली आहे, त्यामुळे त्यांची नाराजी साहजिक आहे. जेव्हा पक्ष उमेदवारी जाहीर केली जाते,

 

 

 

 

तेव्हा या सर्व नाराजी दूर होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शिवसेना भाजप युतीचे सर्व पक्ष पदाधिकारी काम करणार आहेत.”, असं संतोष बांगर म्हणाले.

 

 

 

 

 

“मी पक्षाचे समर्थन करणारा माणूस आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारा मी शिवसैनिक आहे. अजिबात भाजप नाराज नाही,

 

 

 

मी भाजपच्या नेत्यांना बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुमचा आदेश मला मान्य आहे, देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील त्या कामाला लागलो आहोत.

 

 

 

काल जेव्हा नांदेडला उपमुख्यमंत्र्यांना हे शिष्टमंडळ भेटलं, तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला पक्षाचा आदेश, हा अंतिम आदेश असेल आणि ते मान्य करायला ते तयार आहेत.”

 

 

 

असं संतोष बांगर म्हणाले. तसेच, हेमंत पाटील बाबुराव कदम हे इच्छुक उमेदवार आहेत. सर्वेनुसार, पक्ष उमेदवार ठरवेल मला वाटतं की,

 

 

 

उमेदवारी जाहीर झालेली आहे. यामध्ये फेरबदल काय होऊ शकतं? ते पक्षश्रेष्ठी करतील.”, असंही ते म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *