जरांगे -भुजबळांमध्ये जुंपली
Jumpli in Jarange-Bhujbal
जालन्यात मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर ओबीसी समाजाची आज सभा पार पडली यावेळी भुजबळांनी जरांगेंना टार्गेट केलं होतं.
भुजबळांच्या घणाघाती टीकेला आता मनोज जरांगे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. त्यांच्याकडं टीका करण्यापलिकडं काहीही राहिलेलं नाही.
पण आम्ही आरक्षणावर जो फोकस केला आहे तो ढळू देणार नाही. उद्यापासून त्यांना आम्ही महत्व देणार नाही, अशी भूमिका यावेळी जरांगेंनी मांडली.
जरांगे म्हणाले, “आम्ही चिडावं आणि या राज्यात शांतता राहू नयेत यासाठी या सर्वांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काहीही बोलायचं आणि शांतता बिघडवयाची हे काम हे करत आहेत.
त्यांना काय माहिती मी किती शिकलो आणि काय शिकलो? ते किती शिकलेत ज्यामुळं आतमध्ये जाऊन आलेत. आम्ही राज्यात ओबीसी आणि मराठा वाद होऊ देणार नाही.
कारण तेही आमचेच बांधव आहेत. या नेत्यांनीचा त्यांच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरी ही मराठ्यांची एकजूट तुटत नाही आणि ओबीसी मराठा वादही होत नाही.
पण एक ठासून सांगतो तुमच्या टीकेला उत्तर द्यायला आम्ही कच्चे नाहीत. पण आम्हाला आता तुम्हाला महत्वाचं द्यायचं नाही. तुम्ही किती खालच्या पातळीचे आहात हे आमच्या लक्षात आल्यामुळं आमचा दर्जा आम्ही घसरु देणार नाही”
या राज्यात वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाही. सरकारनंच यांच्याकडं जास्तीचं लक्ष केंद्रीत करावं कारण हे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवतील. त्यामुळं यांना थांबवावं, आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहोत. आम्हाला काहीही फरक पडत नाही कारण आम्ही पण ५० टक्के आहोत