महायुतीतील रुसवे -फुगवे , मनोमिलन होईना;महायुतीची डोकेदुखी वाढली

The confusion in the Mahayuti, not the harmony; the headache of the Mahayuti increased

 

 

 

 

राज्यात लोकसभा निवडणुकीचे अद्याप दोन टप्पे शिल्लक आहेत. या दोन टप्प्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २४ जागा येतात. म्हणजेच लोकसभेच्या निम्म्या जागांवर अद्याप मतदान व्हायचं आहे.

 

 

 

 

असं असताना महायुतीची चिंता वाढली आहे. महायुतीचे विविध मतदारसंघातील नेते, आमदार मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या मागे भक्कमपणे

 

 

 

उभं राहत नसल्याचं चित्र दिसू लागलं आहे. अनेक मतदारसंघात मित्रपक्षांनी प्रचारापासून अंतर राखलं आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार अडचणीत आले आहेत.

 

 

 

 

राज्यात महायुतीला फटका बसू नये म्हणून वरिष्ठ पातळीवरुन मनोमिलनाचे प्रयत्न सुरु आहेत. पण अद्याप तरी त्यात हवं तसं यश आलेलं नाही. नाशिक, दिंडोरीत उघड नाराजी दिसून येत आहे.

 

 

 

नाशिकमधून निवडणूक लढवण्यास छगन भुजबळ उत्सुक होते. त्यांच्या नावाची चर्चा दिल्लीतही झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या नावाबद्दल आग्रही होते.

 

 

 

पण नाशिकची जागा शिंदेकडे असल्यानं त्यांनी दावा सोडला नाही. त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली. पण त्यांची नाराजी कायम असल्याचं बोललं जातं.

 

 

 

 

भुजबळ महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत नसल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदेंनी जाहीरपणे केला आहे.

 

 

 

नाशिकसोबतच दिंडोरी मतदारसंघातही महायुती एकदिलानं काम करताना दिसत नाही. दिंडोरीतून भाजपनं डॉ. भारती पवार यांना पुन्हा तिकीट दिलं आहे.

 

 

 

पण अजित पवार गटाचे काही आमदार त्यांच्या प्रचारात दिसत नाहीत. या आमदारांचे प्रमुख कार्यकर्ते शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारात उतरल्याची चर्चा आहे. भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप आमदार कांदेंनी केला आहे.

 

 

 

 

 

जळगाव, रावेर मतदारसंघांमध्ये शिंदेसेनेचे आमदार, नेते भाजप उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले असल्याचं चित्र दिसलेलं नाही. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी जळगावमध्ये येऊन शिंदेसेनेच्या आमदारांवर टीका केली,

 

 

 

 

आरोप केले. त्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मी आतापर्यंत सक्रिय नव्हतो, पण आता महायुतीला जिंकवणारच असा निर्धार केला.

 

 

 

शिंदेसेनेचे आमदार २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीत लढले तेव्हा अनेक ठिकाणी भाजपनं बंडखोर दिले होते. त्या गोष्टी सेनेचे आमदार विसरलेले नाहीत.

 

 

 

 

 

आज तुम्हाला आमचा पाठिंबा हवाय, पण त्यावेळी तुम्हीच आम्हाला त्रास दिला होतात, याची आठवण सेनेच्या आमदारांनी भाजपच्या नेत्यांना जाीहरपणे करुन दिली होती.

 

 

 

 

धुळ्यात सुरुवातीला नाराजी होती. विश्वासात घेतलं जात नसल्याची भावना शिंदेसेना आणि अजित पवार गटाची होती. पण आता ती दूर झाली आहे.

 

 

 

 

नंदुरबारमध्ये भाजपनं विद्यमान खासदार हीना गावित यांनाच तिकीट दिलं आहे. त्यांच्या प्रचारात अजित पवार गट सक्रिय आहे. पण शिंदेसेनेचे प्रमुख नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सक्रिय दिसत नाहीत.

 

 

 

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासोबत रघुवंशी यांचा नेहमीच संघर्ष राहिला आहे. उमेदवार हीना गावित यांनी रघुवंशी यांची भेटही घेतली. पण त्याचा फायदा अद्याप तरी झालेला नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *