एक्झिट पोल फ्रॉड आहे ,भाजपला 800 ते 900 जागा मिळतील

Exit poll is fraud, BJP will get 800 to 900 seats

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानानंतर विविध एक्झिट पोलने आपला अंदाज वर्तविला आहे. या अंदाजाननुसार, भाजपप्रणित NDAचं सरकार बनणार आहे.

 

 

 

 

भाजपप्रणित एनडीएला 370 ते 390 जागांचा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवला आहे. तर इंडिया आघाडीला 130 ते 140 जागा मिळण्याचं भाकीत करण्यात आलंय. या एक्झिट पोलवर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

 

 

 

 

संजय राऊत यांनी हा एक्झिट पोल म्हणजे ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असल्याची खोचक टीका त्यांनी केलीय. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानसाधनेवरुनही यांनी प्रहार केलाय.

 

 

 

 

कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत…एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड आहेत…या पोलवरून भाजपला 800 ते 900 जागा मिळतील

 

 

 

अशी खोचक टीका राऊतांनी केलीय…तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाहीत, या शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला.

 

 

 

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ”अमित शाह यांनी 180 कलेक्टरना फोन करून धमकावलंय. त्यांनी कसं धमकावलंय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.

 

 

 

 

तुम्हाला जर जिंकण्याची खात्री असेल तर सहज तर ध्यान तपस्या करुन निवडणुका जिंकता येणार नाही किंवा अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येत नाही.”

 

 

 

 

”इंडिया आघाडी हे सरकार बनवणार. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहितीय महाराष्ट्रात आणि देशात काय होणार आहे. आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत.”

 

 

 

कालचा एक्झिट पोल म्हणजे ज्याची खावी पोळी, त्याची वाजवाळी टाळी.. ‘पैसा फेको तमाशा देखो’ असा आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये एक्झिट आकडे किती फसवे आहेत हे सांगत त्यांनी एका वाक्यात एक्झिट पोलची हवाच काढली.

 

 

 

 

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 पेक्षा अधिक जागा मिळवेल, 30 तर नक्कीच मिळवणार असा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. सुप्रिया ताई किमान दीड लाख मताने जिंकतील, असा अंदाज देखील संजय राऊतांनी वर्तविलाय.

 

 

 

 

 

दरम्यान कालच्या एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर,

 

 

 

 

विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. त्यानुसार पुन्हा एकदा भाजपप्रणित NDA देशात सत्ता स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *