प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
Prakash Ambedkar behind

लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्याची जनता कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
अशातच कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहे या आकड्यांमध्ये सतत बदल होताना दिसतोय. अशातच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. अकोल्यात त्यांना धक्का बसल्याचा अंदाज समोर येतोय.
अकोल्यात आत्तापर्यंत समोर आलेल्या परिस्थितीनुसार काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांची आघाडी कायम आहे तर भाजपचे अनूप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाड़ीवर आहेत. 13172 मतांनी अभय पाटील आघाडीवर आहेत.
1)अभय पाटील, काँग्रेस. – 202385
2)अनूप धोत्रे, भाजप.- 189213
3)प्रकाश आंबेडकर, वंचित. – 123822एकूण मतमोजणी – 526072
दरम्यान, जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, भाजपने यावेळी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहण्याचं ठरणार आहे.