अजितदादा गटाचे आमदार आक्रमक ,सुनावले खडेबोल ;महायुतीत तणाव

MLAs of Ajitdada group are aggressive, have heard harsh words; tension in the Grand Alliance

 

 

 

 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे.

 

 

 

 

तर अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली.

 

 

 

या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेत संभ्रम आहे.

 

 

संभ्रम दूर झाला नाही तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते, असे खडेबोलच महायुतीला सुनावले आहे. बैठकीनंतर माणिकराव कोकाटे पत्रकारांशी संवाद साधताना

 

 

नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

 

माणिकराव कोकाटे म्हणाले की, मला कुठलाही निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून निरोप आल्याने मी या बैठकीस उपस्थित होतो.

 

 

 

 

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता सुरु झाली आहे. महायुतीकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली असेल तर त्यांचा प्रचार करावा यावर सर्वांचे एकमत झाले आहे.

 

 

 

यात अडचण एकच आहे की, शिक्षक मतदार आहेत. ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांची निगडीत असणाऱ्यांचा शिक्षकांशी अधिक संबंध असतो.

 

 

त्यामुळे ज्यांच्या संस्था आहेत. त्यांनी या निवडणुकीत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच मतदारसंघात प्रचार करताना संपर्कातील जेवढे शिक्षक मतदार आहेत.

 

 

 

त्यांना पक्षाच्या पाठीमागे उभे करणे हे आमचे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला असेल तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल.

 

 

अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना एबी फॉर्म दिला आहे, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, कोण हे? आमच्या पक्षाचा उमेदवार असेल तर

 

 

 

 

आम्ही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार. जर आमच्या पक्षाने माघार घेतली नसेल आणि आम्हाला अजितदादांनी आदेश दिला तर अजित दादा जे सांगितल तेच काम करणार, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

ते पुढे म्हणाले की, मी आजच्या बैठकीत विषय मांडला की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेत संभ्रम आहे. हा संभ्रम लवकर दूर झाला नाही तर,

 

 

 

विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते, असे खडेबोल माणिकराव कोकाटे यांनी महायुतीच्या बैठकीत सुनावले आहे. आता यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर दराडे यांच्यासाठी ही बैठक पार पडत आहे.

 

 

 

 

बैठकीत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

 

 

भावसार यांच्या संदर्भात या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भुजबळांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

 

 

 

मंत्री छगन भुजबळ हे सकाळी 10 वाजता नाशिकहून येवला मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात असूनही छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

 

 

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे या बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला होता.

 

 

 

महायुतीने उमेदवार दिलेला असतानाही अजित पवार गटाने निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत महायुतीत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.

 

 

 

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत देखील फाटाफूट झाल्याचे दिसून आले होते. शिवसेना ठाकरे गटाने मविप्रचे संचालक संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

 

 

 

 

 

तर काँग्रेसकडून दिलीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी माघार घेतली.

 

 

 

 

त्यामुळे संदीप गुळवे यांचा निवडणुकीसाठी मार्ग मोकळा झाला आणि महाविकास आघाडीतील तिढा सुटला होता.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *