विधानपरिषदेचा पहिला निकाल; ठाकरे गटाच्या शिलेदाराचा विजय
The first result of the legislative council is the victory of Shiledara of the Thackeray group

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले आहेत. अनिल परब यांना आतापर्यंत 44,791 मते मिळाली आहेत.
तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. अनिल परब 26 हजार 20 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
मुंबई पदवीधर मतदार संघात उबाठा गटाचे अनिल परब यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली. भाजपा आणि उबाठा उमेदवारांमध्ये मतांमध्ये मोठा फरक पडला आहे. 4 पैकी 2 फेरीतच अनिल परब यांनी जाहीर मतांचा कोटा पूर्ण केला.
मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेल्या 30 वर्षापासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. हा गड कायम ठेवण्याचं आव्हान ठाकरे गटापुढे होते.
यावेळी उमेदवार किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासह
दिग्गज नेत्यांनी याठिकाणी ताकद लावली होती. मात्र, त्यानंतरही अनिल परब यांनी गढ शाबूत ठेवण्यात यश मिळवलं आहे.
कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस)
मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट)
मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती)
नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट)







