आज शरद पवारांनी राज ठाकरेंच्या ट्विटची घेतली फिरकी,म्हणाले ….. !

Today Sharad Pawar took a spin on Raj Thackeray's tweet and said....!

 

 

 

 

राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी,

 

 

 

समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे.

 

आत, शरद पवारांना राज ठाकरेंच्या ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.

 

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे.

 

जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ”आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे,

 

महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.”, असे म्हटले आहे.

 

 

राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.

 

ते आजच नाही, ज्यावेळीही बोलतात… त्यांचं वैशिष्ट्य आहे. 8-10 दिवसांनी, महिन्यांनी, दोन महिन्यांनी ते कधी जागे झाले की, ते बोलतात.

 

साधारणत: ते अशाच विषयावर टीपण्णी करतात, ज्याची दखल वाचक घेतात, ज्यामुळे उद्याच्या पेपरात बातमी होईल, असे म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंच्या ट्विटची फिरकी घेतली.

 

दरम्यान, राज ठाकरे सकाळी उशिरा उठतात, म्हणून अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होते, किंवा सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं जातं. त्यामुळे, शरद पवारांच्या उत्तरावर एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *